प्रतिनिधी;प्रा. भरत चव्हाण –नंदुरबार दोन वर्ष संपूर्ण जग थांबलं होत . कोविड ने संपूर्ण जगाला थांबवून ठेवलं होत . जवळची माणसं लांब जात होती अश्यात कोणताच सण उत्सव साजरा होत नव्हता. यावर्षी सर्व सण उत्सव जोरात साजरे होत आहेत . पण भारतातील आर्थिक विषमता अजून ही तशीच टिकून आहे. गरीब ,मध्यमवर्गीय, श्रीमंत अशी भेदाभेद आहेतच. याचाच विचार मनी आल्याने शहरातील इंजिनियर पायल सोनवणे हिने पदर मोड करत शहरातील गरजू व झोपड पट्टीत राहणाऱ्या लोकांना दिवाळी फराळ वाटण्याचे मनोमनी ठरविले.
फराळ बाहेरून विकत घेवून शहादा पीपल्स बँकेचा पाठीमागील परिसर, डोंगरगाव रोडवरील अंहिंसा चोक, सप्तशृंगी माता मंदीर, बस स्टँड परिसरातील लोकांना फराळ वाटला. वर्षभरापूर्वी पायल ही कॅप जी कंपनीत नोकरीस लागली होती. मागील 28 डिसेंबर 2021 ला तीचा वाढदिवसानिमित्त लोनखेडा येथील आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना नाश्ता वाटप केला होता . तिने फराळ वाटप केल्याने गरजू लोकांनी समाधान व्यक्त केले. तीचा भावी आयुष्यासाठी सुयश चिंतले. पायल सोनवणे ही वसंतराव नाईक उच्च माध्यमिक विद्यालयातील रसायनशास्त्र प्रमुख प्रा गणेश सोनवणे यांची मुलगी आहे. तीचा या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे
Users Today : 26