थंडीची चाहूल लागताच चुलीवरच्या जेवणाची रंगत वाढली..!!

Khozmaster
2 Min Read

दिपक मापारी, रिसोड-हिवाळा लागतात थंडीची चाहूल सुरू होते. हिरव्या भाज्या आणि विविध प्रकारची फळे सध्या सहज उपलब्ध होत आहेत. गॅस वरील स्वयंपाकाला कंटाळलेल्या महिलांनी अंगणात तसेच तेथे चूल पेटविणे शक्य आहे. अशा ठिकाणी चुलीवर स्वयंपाक करायला सुरुवात केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जेवणाची रंगत ही वाढल्याचे दिसून येते. ऑक्टोबर महिना सुरू असून दिवसाचे तापमान 30 ते 32 पर्यंत कायम असले तरी रात्रीच्या तापमानात 15 16 पर्यंत घट झाली आहे. त्यामुळे सकाळी थंडीची चाहूल लागत आहे. गुलाबी थंडीत पौष्टिक पदार्थाच्या सेवनाने आरोग्य सुदृष्ट राहते. त्यामुळे हिरव्या भाज्या बरोबर काजू ,बदाम ,अंजीर, दूध आदी मागणी वाढली आहे. दिवाळीच्या फराळावर ताव मारल्यानंतर तुलशी विवाह, चर्तमास काकडा समाप्ती, वर्षा वास समाप्ती या माध्यमातून सामूहिक भोजनाचा पंगतीचा आस्वाद घेतला जात आहे. आता ग्रामीण भागात रात्रीची जागली. शेकोट्या यातून थंडीचा आनंद घेत गप्पांचे फंड रंगू लागल्याचे दिसून येत आहे. ग्रामीण भागात गॅस वरचे जेवण खाऊन कंटाळलेल्या महिलांनी चुलीवरच्या सामूहिक स्वयंपाकाकडे मोर्चा वळविला आहे. चुलीवर शिजलेली डाळ तांदळाची खिचडी, तुरीचे हिरवे दाणे घालून केलेली आलू वांग्याची रस्सेदारभाजी, जवारीच्या भाकरी, हिरव्या मिरचीचा ठेचा असा मेन्य सामान्य माणसाच्या जेवणाची रंगत वाढवीत आहे. खाण्याची मजा काही औरच असते.मिरची,पातीचा हिरवा कांदा, तुरीचे दाणे, हिरवे मटार घातलेले ताज्या वांग्याचे चुलीवरचे भरीत पालक कोथिंबीर आदी पालेभाज्यांची आवक बाजारात वाढत आहे..

 

0 9 3 7 2 0
Users Today : 1
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *