शिवदास सोनोने ,तालुका प्रतीनिधी- जळगाव जामोद
आपला भारत देश आज़ादी का अमृत महोत्सव साजरा करत आहे . भारत ७५ वा स्वातंत्र्यदिन साजरा करत असताना मेळघाट या आदिवासीबहुल भागात मानवतेला काळीमा फासणाऱ्या घटना ब्रिटिश राजवटीची आठवण करून देत आहेत.
धुळघाट रेल्वे येथील रहिवासी पप्पू चव्हाण, अंकुश मावस्कर आणि आनंद कासदेकर हे युवक बुलढाणा जिल्हातिल संग्रामपूर तालुक्यातील वारी धरण मेळघाट सिमा क्षेत्राला लागून असुन वारी येथील तलावात मासे पकडण्यासाठी गेले असता, मेळघाट व्याघ्र प्रकल्प चे वन कर्मचाऱ्यांनी या आदिवासी तरुणांना अत्यंत तुच्छतेने वागणूक दिली. यातील एका आदिवासी युवक अंकुश गोरेलाल मावस्कर याच्या अंगावर जागोजागी गरम सळ्याने चटके दिले.वनकर्मचाऱ्यांच्या अशा हुकूमशाही वागणुकीमुळे अंकुश मावस्कर गंभीर जखमी झाला.या आदिवासी तरुणांनी तलावात उडी मारून त्यांनी आपले जीव वाचवले. या मध्ये अंकुश गंभीर जखमी झाला आहे. सध्या अंकुशवर धारणी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.मेळघाटातील आदिवासी समाजावर अन्याय,अत्याचार सुरू झाले आहेत.त्यात मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे वरिष्ठ अधिकारी,आदिवासींवर अत्याचार करणाऱ्या अधिकाऱ्यांना पाठीशी उभे राहतात.या घटनेच्या विरोधात मेळघाटातील सर्व आदिवासी समाज व परिसरातील नागरिक जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करणार असून वनविभागाच्या हुकूमशाही कारभाराला वाचा फोडणार आहेत.