राष्ट्रीय एकता दिवस, नॅशनल युनिटी डे निमित्त 11महाराष्ट्र बटालियन एन.सी.सी युनिट द्वारा पाच किलोमीटर युनिटी रन कमांडिंग ऑफिसर कर्नल बिजॉय चौधरी यांच्या मार्गदर्शनानुसार आयोजित करण्यात आली. डॉ पंजाबराव कृषी विद्यापीठ येथील स्टेडियमवर अकोला जिल्ह्यामधील सर्व एनसीसी कॅडेट एकत्रित जमले होते. ह्यावेळी 250 पेक्षा अधिक एनसीसी कॅडेटनी या युनिटी एकता दौंड मध्ये सहभाग नोंदविला. यावेळी 11 महाराष्ट्र बटालियनचे सुभेदार मेजर अशोक कुमार शर्मा ,सुभेदार तेजवीर, सुभेदार दर्शन सिंग, हवालदार आशिष आठवले, हवालदार श्याम पून श्री शिवाजी महाविद्यालय अकोला चे एनसीसी ऑफिसर कॅप्टन डॉ आनंदा काळे, तसेच एनसीसी ऑफिसर लेफ्टनंट डॉ.दारासिंग राठोड , एन सी सी ऑफीसर लेफ्टनंट शिरसाट मॅडम, एनसीसी ऑफिसर कॅप्टन अनिल तिरकर ,एनसीसी ऑफिसर अनिल बंड ,हेमंत ओझरकर, राजेश पाठक, सागर निळे, हेमंत निर्खे, महेश ठोके, परमेश्वर राऊत, शिल्पा बाजाड मॅडम आणि महाविद्यालयामधील व शाळेमधील असंख्य एनसीसी कॅडेटस या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. या रॅलीमध्ये शहरातील श्री शिवाजी महाविद्यालय , श्रीमती राधादेवी गोयंका महिला महाविद्यालय, शिवाजी विद्यालय अकोट, डॉ.पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला ,लक्ष्मीबाई राधाकिसन तोष्णीवाल कॉलेज , सीताबाई कला महाविद्यालय , मांगीलाल शर्मा विद्यालय अकोला, एस आर कॉलेज वनोजा, भारत विद्यालय ,माउंट कार्मेल अकोला होली क्रॉस कॉन्व्हेंट अकोला
आर एल टी कॉलेज, जुबली हायस्कूल अकोला इत्यादी शाळा महाविद्यालयाच्या एनसीसी कॅडेटनी यामध्ये सहभाग नोंदविला
विद्यार्थ्यांमध्ये तसेच एनसीसी कॅडेट मध्ये शिस्त व एकता निर्माण व्हावी म्हणून अशा प्रकारच्या युनिटी दौड आयोजित करण्यात येतात. आपल्या जीवनामध्ये आपले आयुष्याचे ध्येय गाठण्याकरिता सतत चिकाटी, परिश्रम या गोष्टींची आवश्यकता आहे हे सर्व गुण त्यांनी एनसीसी मध्ये राहून शिकणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन 11 महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल बिजॉय चौधरी यांनी यावेळी केले. यावेळी विद्यार्थ्यांनी स्टेडियम पासून पाच किलोमीटर पर्यंत वेगवेगळ्या मार्गावरून दौड केली. यावेळी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग होता. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लेफ्टनंट डॉ.दारासिंग राठोड यांनी तर आभार प्रदर्शन लेफ्टनंट शिरसाट मॅडम यांनी केले.
Users Today : 18