31- 10 -2022 रोजी मेहकर शहर काँग्रेस कमिटीच्या भारताच्या माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिराजी गांधी यांची पुण्यतिथी व, भारताचे माजी गृहमंत्री लोहपुरुष स्वर्गीय सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती अभिवादनाचा कार्यक्रम ऍड अनंतराव वानखेडे यांच्या जनसंपर्क कार्यालयावर आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस श्यामभाऊ उमाळकर हे होते यावेळी माजी नगराध्यक्ष विलासराव चनखोरे, मेहकर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पंकज हजारी, भीमशक्तीचे राज्य सरचिटणीस भाई कैलास सुखदाने, सेवा दलाचे राज्य सरचिटणीस शैलेश बावस्कर मा नगराध्यक्ष राजेश अंभोरे यांची समायोजित भाषणे झाली
यावेळी अध्यक्षपदावून बोलताना शामभाऊ उमाळकर म्हणाले आपले वडील पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याकडून राजकीय धडे घेत इंदिराजी गांधी देशाच्या पंतप्रधान झाल्या पंतप्रधान या नात्याने इंदिराजी गांधी राजकीय आडमुठेपणासाठी आणि सत्तेच्या अभूतपूर्व केंद्रीकरणासाठी ओळखल्या जात होत्या पूर्व पाकिस्तान मधील स्वातंत्र्य चळवळ आणि स्वातंत्र्याच्या लढाईच्या समर्थनार्थ त्यांनी पाकिस्तानशी युद्ध केले, ज्यामुळे भारताचा विजय झाला व बांगलादेशची निर्मिती झाली तसेच या विजयामुळे दक्षिण आशियामध्ये भारताचा प्रभाव वाढून भारत हा येथील एकमेव प्रादेशिक शक्ती बनला असे गौरव उद्गार श्याम भाऊ उमाळकर यांनी काढले यावेळी पुढे बोलताना सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनपटावर प्रकाश टाकला ते म्हणाले सरदार वल्लभभाई पटेल यांचे स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी मोला चे योगदान आहे भारत छोडो आंदोलन मध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता भारताला स्वतंत्र मिळाल्यानंतर देशाचे पहिले गृहमंत्री व उपपंतप्रधान झाले या रूपात त्यांनी पाकिस्तान हुन आलेल्या व पंजाब व दिल्ली येथे राहणाऱ्या निर्वासितांच्या मदतीसाठी खूप मोठे काम केले आणि नंतर उफाळलेल्या हिंसाचारानंतर शांतता प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी कार्य केले वल्लभ भाई पटेल यांनी भारतातील 565 अर्धस्वयता संस्थेचे भारतात विलीनीकरण करून घेणे हे सरदार पटेल यांचे सर्वात मोठे कार्य असे प्रतिपादन श्याम श्यामभाऊ उमाळकर यांनी केले
यावेळी मेहकर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पंकज हजारी यांनी इंदिराजी गांधी, सरदार वल्लभाई पटेल यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला व नफरत छोडो भारत जोडो असा नारा देत त्यांनी भारत जोडो यात्रेत जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन शहर काँग्रेस कडून केले यावेळी मा. नगरसेवक रवी सावजी,मा. नगरसेवक संजय म्हस्के, मा. नगरसेवक उस्मान शाहा, युवा काँग्रेस नेते दिलीप बोरे , सरपंच संजय सूळकर, नितीन तुपे,शाहूभाऊ गवळी सुखदेव ढाकरके, युवा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भूषण काळे, अनुसूचित जातीचे तालुकाध्यक्ष विकास पवार छोटूभाई गवळी, नारायण भाऊ पचेरवाल, युवा काँग्रेस विधानसभा सरचिटणीस आशुतोष तेलंग, अनुसूचित जाती शहराध्यक्ष आकाश अवसरमोल ऍड गोपाल पाखरे, मुनाफ खान, जिल्हा युवक काँग्रेस महासचिव शैलेश गवई, अवसरमोल काका, उस्मान भाई, गफूर भाई इत्यादी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संजय वानखेडे यांनी तर आभार प्रदर्शन नारायणभाऊ इंगळे यांनी केले.
Users Today : 21