आ. सौ. श्वेता ताई महाले पाटील चिखली : यावर्षी भरपूर पाऊस पडलेला आहे. नदी नाले , धरणे , पाझर तलाव तुडुंब भरलेली आहेत . पाणी पुरवठ्याचे स्रोत सुद्धा सद्यस्थितीत पाण्याने भरलेले आहे . कोणतेही प्रकारची पाणीटंचाई आता तरी सध्या दिसत आहे. परंतु भविष्यामध्ये उन्हाळ्यामध्ये दरवर्षीप्रमाणे नियोजन शून्यतेमुळे पाणी असतानाही पाणीटंचाई जाणवत असते . यावर्षी पाणीटंचाई जाणवणार नाही . परंतु काही ठिकाणी पाऊस जरी पडलेला असला तरी सुद्धा पाणी साठवण्याची क्षमता नसल्याने काही गावांमध्ये पाणीटंचाई जाणवण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा ठिकाणी पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पाणीटंचाईचे सुनियोजन करून आतापासून आराखडा तयार करून उन्हाळ्यातील पाणीटंचाईवर मात करण्याच्या सूचना आमदार श्वेता ताई महाले यांनी चिखली आणि बुलढाणा तालुक्यातील पाणीटंचाईच्या आढावा बैठकीदरम्यान उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या दि १ नोव्हेंबर 2022 रोजी चिखली विधानसभा मतदारसंघातील चिखली आणि बुलढाणा तालुक्यातील उन्हाळ्यामध्ये उद्भवणाऱ्या पाणी टंचाई संदर्भामध्ये अधिकाऱ्यांची आ सौ श्वेता ताई महाले पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. आयुष्यमान भारतचे कार्ड वितरण कराभारताचे पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी आथिर्क दुर्बल घटकातील कुटुंबांसाठी आयुष्यमान भारत योजना सुरू केली या योजनेत एक हजाराच्या वर आजारावर मोफत उपचार केल्या जातो. यामध्ये साडे सात लाखापर्यंटचा खर्च या योजनेतून केल्या जातो. प्रत्येक ग्राम पंचायत, CSC सेंटर , महा ई सेवा केन्द्र या ठिकाणीं आपण लाभार्थी आहोत किंवा नाही याची माहिती मिळते तसेच त्याच ठिकाणावरून कार्ड सुद्धा उपलब्ध केल्या जाते . परंतू अद्याप पात्र लाभार्थ्यांना आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड वितरण झालेले नसल्याने पात्र असूनही लाभार्थी यांना लाभ मिळत नाही. त्यामुळे आयुष्यमान भारतचे कार्डचे तातडीने वितरण करण्याच्या सूचना देखील आ सौ श्वेता ताई महाले पाटील यांनी यावेळी दिल्या.जलजिवन मिशनमुळे चिखली तालुका पाणी टंचाई मुक्त झालेला असेल चिखली तालुक्यातील ११४ गावात १०१ जल जिवन मिशन अंतर्गत पिण्याच्या पाण्याच्या योजना प्रस्तावीत केलेल्या आहे. त्यापैकी ५१ योजनांना प्रशासकीय मान्यता मिळाली ८ योजनांचे कामांचे कार्यारंभ आदेश देण्यात आले आहे. उर्वरीत ४२ योजनांना लवकरच मान्यता मिळणार आहे. त्यामुळे लवकरच चिखली तालुक्यातील प्रत्येक गाव पाणी टंचाई मुक्त झालेले असेल असा विश्वास देखील आ सौ श्वेता ताई महाले पाटील यांनी यावेळी व्यक्त केला. कृषी पंपाना सुरळित विज पुरवठया चे उपाययोजना नियोजन करा यावर्षी पाणी टंचाई नाही . विहिरी तलाव तुडुंब भरलेले आहे. परंतु विज टंचाई मुळे रब्बी हंगामात पिके हातून जाऊ नये म्हणून कृषी पंपाना सुरळित विज पुरवठया साठी तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना देखील दिल्या आहे. यावेळी गट विकास अधिकारी आवळे , प्रभारी उपविभागीय अभियंता विज वितरण कंपनी बोरकर , जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सांगळे , नायब तहसीलदार विर , संजय महाले , संतोष काळे पाटिल, पंजाब धनवे पाटिल, सुनिल पोफळे पाटिल, पत्रकार उद्धव ठुट्टे पाटिल, नंदूभाऊ कऱ्हाडे,संतोष काळे,, सुनील शेळके, प्रकाश चिंचोले, सर्व सरपंच , विस्तार अधिकारी, ग्रामसेवक यांची मोठया प्रमाणात उपस्थीती होती.
Users Today : 21