रस्त्यांच्या विकासातून मतदार संघाचा विकास साधायचा-आ. सौ. श्वेता ताई महाले

Khozmaster
4 Min Read

चिखली: कोणत्याही गावाचा विकास हा त्या गावात जाणाऱ्या रस्त्यांवर अवलंबून असतो . म्हणूनच रस्त्यांना विकासाची धमनी म्हटल्या गेले आहे. माझ्या चिखली विधानसभा मतदार संघातील रस्त्यांची सुद्धा दयनीय अवस्था झालेली आहे. प्रत्येक रस्ता हा चांगला व्हावा यासाठी माझा प्रयत्न सुरु आहे. मतदार संघातील योजना बाह्य रस्ते योजनेत समाविष्ट करण्यासाठी प्रस्ताव तयार होउन शासन दरबारी सादर केले आहे. सदर योजना बाह्य रस्त्यांना नंबर मिळाल्यानंतर त्या रस्त्यांना ग्रामीण रस्त्यांचा दर्जा प्राप्त होणार आहे. त्यामुळे सदर रस्त्यांवर शासकिय निधी खर्च करता येणार आहे. तसेच ज्या रस्त्यांना ग्रामीण मार्गाचा दर्जा प्राप्त झालेला आहे त्या रस्त्यांना इतर जिल्हा तर ईतर जिल्हा मार्गांना प्रमूख जिल्हा मार्गात आणि प्रमूख जिल्हा मार्गांना राज्य महामार्गात दर्जा वाढ करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात आले असून लवकरच मतदार संघातील अनेक रस्त्यांची दर्जा वाढ झालेली असणार आहे. तसेच दोन गावांना जोडणाऱ्या अनेक रस्त्यांना कृती आराखड्यात समाविष्ट केलेले आहे . त्यामुळे रस्त्यांच्या विकासातून मतदार संघाचा विकास साधायचा माझा प्रयत्न असणार असल्याचे प्रतिपादन आ सौ श्वेता ताई महाले पाटील यांनी केंद्रिय मार्ग निधी मधुन मंजुर केलेल्या दुधा- माळवंडी – केसापूर – पागरी – शिरपूर – केळवद प्रमुख जिल्हा मार्गाचे भव्य भूमिपूजन प्रसंगी केले.

 

दि 31/10/2022 रोजी चिखली विधानसभा मतदारसंघातील दुधा- माळवंडी – केसापूर – पागरी — शिरपूर – केळवद या मार्गाच्या सुधारणेचे भूमिपूजन आज 31 ऑक्टोबर रोजी आ सौ श्वेता ताई महाले पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. हा प्रमुख जिल्हा मार्ग – 27 कि. मी.चा असून 10/00 ते 20/00 मधील रस्त्याची सुधारणा करण्यासाठी सतत पाठपुरावा करून केंद्रीय मार्ग निधी (CRF) अंतर्गत 5 कोटी 85 लाख रुपये मंजूर करून आणल्यानंतर आज शिरपूर येथे भव्य भूमिपूजन सोहळा संपन्न झाला.

 

आ. सौ .श्वेता ताई महाले म्हणजे विकासाचा झंझावात-संदिप शेळके

चिखली विधानसभा मतदारसंघांमध्ये आमदार संशोताताई महाले हा आमदार झाल्यापासून विकासाची गंगा वाहत आहे .चिखली विधानसभा मतदारसंघांमध्ये सर्वांगीण विकासासाठी त्या सतत प्रयत्नशील असून त्यांनी आतापर्यंत कोट्यावधी रुपयांचा निधी खेचून आणला आहे. जलसंधारणच्या कामासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध करून चिखली विधान सभा मतदार संघात अनेक ठिकाणी द्वार युक्त सिमेंट बंधारे बांधण्यात आल्याने हजारो हेक्टर जमीन सिंचनाखाली आली आहे. रस्त्यांसाठी सुद्धा मोठया प्रमाणात निधी उपलब्ध करून दिल्याने अनेक रस्त्यांची कामे सुरू झालेली आहे. आमदार निधी 2515 या माध्यमातून प्रत्येक गावात विकास कामे सुरू झालेली आहे. त्यामुळे आ सौ श्वेता ताई महाले म्हणजे विकासाचा झंझावात असल्याचे प्रतिपादन राजश्री शाहू पतसंस्थेचे अध्यक्ष संदिप शेळके यांनी यावेळी केले आहे.

 

या वेळी सर्वश्री तालुका अध्यक्ष ॲड सुनील देशमुख,संदीप शेळके अध्यक्ष राजश्री शाहू बँक, पंडित दादा देशमुख शहराध्यक्ष भाजप, ॲड मोहन पवार जिल्हा अध्यक्ष विधी आघाडी, डॉ राजेश्वर उबहंडे तालुका सरचिटणस , दिनकर शेळके, नानू सुसर, भागवत सुसर, संजय पाटील, नारायण पाटील, माणिकराव पाटील, दीपक शेळके, दिगंबर शेळके, सौ. लक्ष्मी शेळके नारायण पाटील,दिनकर शेळके गुलाबराव सुसर जनार्दन सुसर दिनकर गव्हाणे बाळासाहेब शेळके सुभाष शेळके भागवत सुसर समाधान सुसर मोतीराम शेळके मुरलीधर शेळके माणिकराव शेळके ज्ञानेश्वर सुसर तेजराव शेळके शांताराम शेळके दिगंबर शेळके शरद शेळके दत्तू हिवाळे राजीव शेळके मधुकर पवार चंद्रकांत हिवाळे शिवाजी शेळके कैलास शेळके राम शेळके संजय सुसर समाधान सुसर योगेश सुसर आदीची उपस्थित होते.

0 9 4 6 7 1
Users Today : 21
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *