सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा

Khozmaster
1 Min Read

प्रतिनिधी राहुल सोनोने ( मळसुर)

आज दिनांक 31.10.2022 रोजी सकाळी 11:00 वाजता पोलीस स्टेशन चान्नी येथे भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांचे जयंती निमित्त राष्ट्रीय एकता दिवस म्हणून शपथ घेण्यात आली. शपथ घेण्याकरता पो स्टे येथे 02 अधिकारी 12 कर्मचारी हजर होते. तसेच चान्नी गावातील तरुण मुले व नागरिक यांना बोलावून त्यांना देखील राष्ट्रीय एकात्मता दिवसाच्या अनुषंगाने माहिती दिली. तसेच राष्ट्रीय एकता दिवसाच्या अनुषंगाने Unity Run घेण्यात आला. सर्व अधिकारी व कर्मचारी व नागरिक यांना सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या तसेच राष्ट्राची एकता व अखंडता कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याबाबत सूचना देण्यात आल्या. *कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

0 9 4 6 1 2
Users Today : 26
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *