अनंत नाथाच्या दरबारात अनाथांची भाऊबीज

Khozmaster
3 Min Read

पादुका संस्थान मुंडगाव येथे बालीकाश्रमातील मुलींचा दिवाळी भाऊबीज सोहळा संपन्न)  प्रतिनिधी विशाल गवई अकोटशहर    श्री गजानन महाराज पादुका संस्थान मुंडगाव येथे अनाथ मुलींचा भाऊबीज कार्यक्रम सोहळा उपजिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.  श्री गजानन महाराज पादुका संस्थान मुंडगाव येथे गायत्री बालिकाश्रम व उत्कर्ष शिशु गृह अकोला येथील मुला मुलींचे संस्थानच्या वाहनातून मुंडगावात आगमन झाले. गावाच्या बाहेर बालकांचे भजनी दिंडी व बॅण्ड, फटाके फोडून स्वागत गावकऱ्यांनी केले. मुलींचे ठीक ठिकाणी पुष्प वर्षाव करून स्वागत झाले. नंतर पादुका संस्थान मध्ये आणल्यावर,भक्तांनी पाय धुवुन बालीका पूजन केले. बालीकांना गाभाऱ्याच्या आतुन विशेष दर्शन देण्यात आले सकाळचे मिष्टान्न भोजन झाल्यावर गावातील इतर मंदिरात व गावात फेरफटका झाला. संध्याकाळी ४. ३० वाजता भाऊबीज ओवाळणी कार्यक्रम पार पडला.कार्यक्रमाची सुरुवात श्रींच्या प्रतिमेचे दिप पूजन करून करण्यात आली.    व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. संजयजी खडसे साहेब निवासी उपजिल्हाधिकारी तर प्रमुख अतिथी म्हणून सुधाकरजी गिते व सौ. मिराताई जोशी संचालक गायत्री बालिकाश्रम, सुकदास महाराज गाढेकर पाटसुल, शशिकांत सेठ अग्रवाल, अकोट, कैलास सेठ अग्रवाल, अकोट मनिष मोडक अध्यक्ष पानेट संस्थान, तुळशीरामजी इस्तापे बोर्डी, ह. भ. प. श्री गजानन महाराज हिरुळकर, प्रदिप वानखडे, श्रीकृष्ण रोठे, श्रीकृष्ण खोकले यांची उपस्थिती लाभली . सर्व मान्यवरांचे शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.       यावेळी गावातील सौ. योगीताताई जनार्दन खलोकार व सौ. पल्लवीताई पंकज देशमुख या कर्तृत्ववान महिला उद्योजीकांचा मान्यवरांच्या हस्ते साडी चोळी देवुन सन्मान करण्यात आला.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थानचे कोषाध्यक्ष विजय ढोरे यांनी केले तर सुकदास महाराज गाढेकर व ह. भ. प. हिरुळकर महाराज यांनी आपले विचार व्यक्त केले. अनुकूल सांगोळे यांनी या सोहळ्याकरीता ज्या दानदात्यांचे हातभार लागले, त्यांची नावे जाहिर केली. विराट विजय ढोरे या चिमुकल्याने कवीतेतुन शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी सिने गायीका वैशाली सावंत यांनी व्हिडीओ द्वारे या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या, तो व्हिडीओ प्रदर्शित करण्यात आला. नंतर संजयजी खडसे यांच्या अध्यक्षीय भाषणाने उपस्थितांना भावूक बनवले.आभार प्रदर्शन कैलास खडसान तर संचलन सौ. सविताताई तायडे मॅडम, येवदा यांनी केले.    कार्यक्रमाच्या नंतर भोजन झाल्यावर बालीकाश्रमातील मुलींनी फटाके फोडून आनंद साजरा केला. भक्त दानदात्यांनी या मुलींसाठी भरपुर फराळ, मिष्टान्न, चॉकलेट, स्वेटर, ब्लॅन्केट, कपडे भेट म्हणून दिल्या .     या सोहळ्याला श्री गजानन महाराज पादुका संस्थानचे अध्यक्ष विलास बहादुरे, व्यवस्थापक महेश गाढे, विश्वस्त ज्वारसिंग आसोले. गावचे पोलीस पाटील बाळकृष्ण भगेवार, सरपंच श्रावण भरक्षे, सल्लागार समितीचे सदस्य रमेश भाऊ खलोकार, जुगलसेठ मल, प्रल्हादराव सापधारे , संस्थानचे सेवाधारी व शेकडो गावकरी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भाऊबीज सोहळा व्यवस्थापन समितीचे सदस्य अशोक बेलसरे, छगन अंबळकार, नरेश ठाकरे गुरुजी, नितीन गणगणे, दिपक सापधारे, अशोक गणगणे, डॉ. सुभाष रोठे, जगदीश शेटे, वैभव कुबेटकर, प्रशांत आकोते, शुभम हाडोळे, जनार्दन खलोकार तसेच संस्थानचे कर्मचारी शरद म्हैसने, प्रल्हाद पाठक, हरसिंग रहेनवाल, रामदास महल्ले, गजानन इंगळे, प्रकाश क्षीरसागर, वसंत पनायकर यांनी परिश्रम घेतले.

 

0 9 4 7 8 5
Users Today : 25
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *