तालुका प्रतिनिधी दत्ता हांडे परतीच्या सतत पडणाऱ्या पावसाने सिंदखेड राजा तालुक्याताला अक्षरशा झोडपून काढलेआहे ढगफुटी सदूषधय पावसामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले. या नुकसानीचा शेतकऱ्यांना त्वरित मोबदला देण्यासाठी 31 ऑक्टोंबर रोजी भाजप नेते डॉक्टर सुनील कायंदे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकऱ्यांनी उपविभाग अधिकाऱ्यांना निवेदन देवून मागणी केली निवेदनात नमुद आहे की परतीच्या पावसाने शेतकऱ्याच्या सोयाबीन व कपाशी सह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले शेतकऱ्याच्या तोंडाची आलेला घास गेल्याने शेतकऱ्याची दिवाळी अंधारात गेली त्यामुळे शेतकरी खचून गेला असून अडचणी सापडला असल्याने पडतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचा मोबदला शासनाने त्वरित द्यावा तसेच किनगाव राजा दुसर बीड .मलकापूर पांग्रा . सोनोशी.महसुल मंडळ सह संपूर्ण सिंदखेडराजा तालुका आलो दुष्काळ म्हणून जाहीर करावा सरसकट पंचनामे करून अहवाल शासनास पाठवावा पिक विम्याची 100 टक्के रक्कम परतावाल लवकरात लवकर शेतकऱ्यांना देण्यात यावा.मागील वर्षाचे किनगाव राजा महसूल मंडळातील शेतकऱ्यांचे मंजून झालेले पैसे अजुनही मिळालेले नाहीत ते लवकरात लवकर देण्यात यावे. समृद्धी महामार्गता ज्या शेतकऱ्यांची जमिनी संपादित करण्यास आली. त्या समृद्धी लगतच्या शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी रस्ता करून देण्यात यावा. समृद्धी महामार्गाचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात येऊन शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे नुकसान होते आहे.
Users Today : 21