समर्थ कृषी महाविद्यालयात सरदार वल्लभभाई पटेल जयंती व इंदिरा गांधी स्मृतिदिन साजरा करण्यात आला.

Khozmaster
1 Min Read

तालुका प्रतिनिधी दत्ता हांडे समर्थ कृषी महाविद्यालय देऊळगाव राजा येथे भारताचे प्रथम गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती राष्ट्रीय एकता दिवस म्हणून तर भारताच्या प्रथम महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी राष्ट्रीय संकल्प दिवस म्हणून झाली. यावेळी सरदार वल्लभभाई पटेल व इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पार्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य नितीन मेहेत्रे यांनी इंदिरा गांधी यांच्या कार्यास उजाळा देत, त्यांनी घेतलेल्या आणीबाणी, ऑपरेशन ब्लू स्टार यासारखे धाडसी निर्णयाची विद्यार्थ्यांना माहिती दिली, इंदिरा गांधी यांच्या जीवनपट विद्यार्थ्यांसमोर ठेवला. या कार्यक्रमास प्रा. नारायण बोडके, प्रा. विलास सातपुते, प्रा. किरण ठाकरे, प्रा. लिकेश मेश्राम, इतर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

 

0 9 4 6 7 1
Users Today : 21
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *