शासकीय सर्वोपचार रुग्णालयात रक्तपेढीतील कामचुकार कर्मचाऱ्यांना निलंबित करा – उमेश इंगळे

Khozmaster
2 Min Read

प्रतिनिधी रामेश्वर वाढी

अकोला :- शासकीय सर्वोपचार रुग्णालयातील रक्तपेढीतिल कामचुकार कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र महासचिव उमेश सुरेशराव इंगळे यांनी सर्वोपचार रुग्णालयातील अधिष्ठाता यांना दिलेल्या निवेदनातुन केली आहे सर्वोपचार शासकीय रुग्णालयात रुग्णांना प्लेट्स लेट मिळत नाही गोरगरिब रुग्णांना पैसे खर्च करून खासगी रक्तपेढीतुन रक्त व प्लेट्स लेट आणावे लागतात याकरीता महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटनेच्या शिष्टमंडळाने रक्तपेढीची काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण भोटकर सर यांच्या आदेशानुसार पाहणी केली असता रक्तपेढीतील प्लेट्स लेट बनवायची मशिन गेल्या एका दिड महिन्यांपासून बंद आहे असे दिसून आले होते संबंधित अधिकारी यांना विचारले असता लवकरात लवकर मशिन सुरू करण्याचे आदेश दिले आहेत असे सांगितले महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र राज्य महासचिव उमेश सुरेशराव इंगळे यांनी त्यांना आठ दिवसांचा कालावधी दिला होता आठ दिवसांत जर प्लेट्स लेट बनवायची मशिन सुरू झाली नाही तर महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना तिव्र आंदोलन छेडेल असा इशारा दिला होता आज उमेश सुरेशराव इंगळे अधिष्ठाता यांच्या कार्यालयात आंदोलन करणार आहेत याची माहिती मिळताच डॉ गुरूदासानी यांनी भेट देऊन व लवकरच मशिन सुरू करण्यात येईल असे आश्वासन दिले महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटनेच्या वतीने शासकीय सर्वोपचार रुग्णालयातील डॉ गुरूदासानी सर यांना निवेदन देऊन त्या रक्तपेढीतील कामचुकार कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित यावे व रक्तपेढीतील प्लेट्सलेट बनवायची मशिन लवकर सुरू करावी यावेळी महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र राज्य महासचिव उमेश सुरेशराव इंगळे, जिल्हा महासचिव समिर खान, जिल्हा सहसचिव सतिश तेलगोटे, उमेश शेजे,सुरज खंडारे आदी महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना पदाधिकारी उपस्थित होते

0 9 4 7 8 5
Users Today : 25
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *