हायकोर्टातील अटकपूर्व जामीन अर्ज घेतला मागे...आरोपींच्या सुटकेकरीता शिष्टमंडळाचे केविलवाणी प्रयत्न…..अडगाव बु…. गेल्या तीन महिन्यांपूर्वी अडगाव बु येथे भर रस्त्यावर झालेल्या मारहाण व लुटमार प्रकरणातील प्रमुख आरोपी शेख राजिक कुरेशी याला आता अटकेशिवाय पर्याय राहिला नसल्याने आता तो लवकरच जेरबंद होणार…..अडगाव बु बसस्टँड ते गावात येणाऱ्या मुख्य रस्त्यावर ऑगस्ट च्या पहिल्या आठवड्यात शेख अमिरउल्ला याला एकट्याला पकडून त्यांचेवर प्राणघातक हल्ला करून त्यांचे जवळचे दहा हजार रुपये लुटल्याची घटना घडली होती यात शेख बरकतउल्ला यांनी दिलेल्या तक्रारीवरून त्यावेळी ठाणेदार विजय चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली दुय्यम ठाणेदार बगडेकर यांनी सहा आरोपी विरुद्ध दंगल सह लुटमार सबंधी गंभीर गुन्हे दाखल केले होते यात पाच आरोपींना पोलिसांनी अटक करुन पी सी आर, एम सी आर व नंतर कारागृहात रवानगी असा प्रवास पुर्ण केला आहे परंतु गेल्या तीन महिन्यांपासून या प्रकरणातील प्रमुख आरोपी शेख राजिक शेख रहीम हा पोलिसांना चकमा देत फरार झालेला आहे दरम्यानच्या काळात शेख राजिक याने अटक न होता अटकपूर्व जामीन साठी गेल्या महिन्यात अकोला जिल्हा सत्र न्यायाधीश सत्र न्यायालय अकोट मध्ये अटकपूर्व जामीन साठी अर्ज केला होता परंतु त्यावेळी सरकारी वकील ॲड अजीत देशमुख,ॲड इंगोले व ॲड सतिश उगले यांनी केलेल्या युक्तिवाद नंतर या गंभीर प्रकरणात सत्र न्यायाधीश चकोर बाविस्कर यांनी शेख राजिक याचा जामीन अर्ज फेटाळला होता त्यानंतर पैसा आणि आपलं राजकीय वजन वापरत शेख राजिक याने अटकपूर्व जामीन साठी हायकोर्टात धाव घेतली होती परंतु तेथेही गुन्हा गंभीर असल्याने व फिर्यादी पक्षाने अटकपूर्व जामीन अर्जबाबत आक्षेप दाखल केल्याने आपला अटकपूर्व जामीन अर्ज रद्द होत असल्याची कुणकुण आरोपीला लागली त्यानंतर शेख राजिक याने अटकपूर्व जामीन साठी केलेला अर्ज मागे घेतल्याने आता या गुन्ह्यातील प्रमुख आरोपी शेख राजिक कुरेशी याला अटकेशिवाय पर्याय राहिला नाही अशी परिस्थिती असताना आपल्या सहकाऱ्याची सहिसलामत सुटका व्हावी म्हणून एक शिष्टमंडळ कार्यरत झाल्याची गावात चर्चा सुरू आहे याचं शिष्टमंडळाने अधिकारी यांचे पर्यंत शेख राजिक यांची बाजू मांडली परंतु हा गंभीर गुन्हा असल्याने आरोपीला अटकेशिवाय पर्याय नाही असे खडे बोल अधिकारी यांनी शिष्टमंडळाला सूनावल्याची सुद्दा गावात चर्चा सुरू आहे.
Users Today : 25