आ. सौ. श्वेता ताई महाले पाटील चिखली : कितीही पाऊस पडला तरी उन्हाळ्यात पाणी टंचाई ही ठरलेलीच आहे. उन्हाळ्यात सगळे पाण्याचे स्त्रोत आटून गेलेले असतात. त्यामुळे आया बहिणींना काखेत हंडा त्यावर कलशी , डोक्यावर एक दोन हंडे पुन्हा कळशी घेउन दूरवरून पाणी आणून घरातील चिल्ल्या पिल्यांची तहान भागवावी लागते. पाणी पुरवठा योजना यापूर्वी सुद्धा झाल्या या पुढे ही होतील. परंतू पाण्याचे स्त्रोतच आटले तर पाण्यासाठी पायपीट ही होणारच. आपण नागरिकांना वर्ष भर मुबलक पिण्याचे पाणी देऊ शकत नाही ही खेदाची बाब आहे . हा खेद मला जास्त खात आहे. त्यासाठी प्रत्येक गाव पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाले पाहिजे यासाठी मी निवडून आल्यापासून प्रयत्न करीत आहे. त्यासाठी अधिकाऱ्यांच्या अनेक बैठका घेउन पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या संकल्पनेतून जल जीवन मिशन मध्ये चिखली विधान सभा मतदार संघातील जास्तीत जास्त गावे समाविष्ट करून घेतली. त्यासाठी पाणी पुरवठ्याचे स्रोत जास्तीत जास्त बळकट करण्यावर सुद्धा माझा भर असणार आहे. पाणी स्रोत बळकट असतील तरच पाणी टंचाई दूर करता येणे शक्य आहे . नाही आता पर्यंत अनेक पाणी पुरवठा योजना झाल्या पण आमच्या भगिनीनींच्या घागरी तहानलेल्या राहतील अशी खंत आ सौ श्वेता ताई महाले पाटील यांनी चिखली विधानसभा मतदार संघातील जल जीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनांचे भूमिपूजन प्रसंगी व्यक्त केली. दि २/११/२०२२ रोजी चिखली विधान सभा मतदार संघातील जलजीवन मिशन अंतर्गत ६ कोटी ७८ लक्ष रुपयांच्या पाणीपुरवठा योजना व रस्ते कामांचा भव्य भूमिपूजन सोहळा आ. सौ. श्वेताताई महाले पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. यमध्ये जलजीवन जीवन मिशन अंतर्गतमौजे केसापुर पाणी पुरवठा योजना किंमत २ कोटी रुपये , मौजे अटकळ येथे किंमत ९२ लक्ष रूपयेमौजे सोयगाव येथे किंमत १ कोटी ३२ लक्ष रुपयेमौजे वरूड येथे किंमत २ कोटी ५४ लक्ष रुपये या योजनांचे भूमिपूजन करण्यात आले. देविदास पाटील जाधव, जिल्हा उपाध्यक्ष भाजप, ओमसिंग राजपुत शिवसेना जिल्हा प्रमुख, दत्ता पाटील जिल्हा उपाध्यक्ष भाजप अॅड. सुनिल देशमुख तालुका अध्यक्ष भाजप, श्रीरंग अण्णा वेन्डोले जिल्हा कार्यकारणी सदस्य, सखाराम नरोटे जिल्हा कार्यकारी सदस्य, ॲड मोहन पवार जिल्हा अध्यक्ष भाजप विधी सेल,धनंजय बरोटे तालुका प्रमुख शिवसेना, साहेबराव पाटील गवते जिल्हा उपाध्यक्ष किसान आघाडी, पंजाबराव धनवे जिल्हा सरचिटणीस युवा मोर्चा , योगेश राजपुत तालुका अध्यक्ष युवा मोर्चा, संदीप उगले पाटील पंचायत समिती सदस्य, शंकरभाऊ तरमळे भाजपा नेते, डॉ. श्री. राजेश्वर उबरहंडे तालुका सरचिटणीस भाजप, विलास अहेर जिल्हा सचिव किसान आघाडी, राजू नाटेकर जिल्हा उपाध्यक्ष अनुसूचित जाती जमाती, अनिल सोनट्टके जिल्हा सचिव अल्पसंख्यांक, अर्जून दांडगे सरपंच दहित,नितीन राजपूत, गणेश राजपूत तालुका उपाध्यक्ष भाजपा, रामधन कोल्हे, दिनेश गवते तालुका सचिव भाजपा, राजु कोल्हे, गजानन रोजेकर, मा. श्री. रेहान संजरी, मा. श्री. प्रदीप मांडवगडे, शेख खालिद, दत्ता शेवाळे जिल्हा सचिव , आस्थिक वारे सरपंच देवपूर , संदीप सोनुने, काशीराम निकम, गणेश निकम,सरपंच केसापुर सौ किरणताई बीलारी ,सरपंच दहित-अटकळ प्रकाशभाऊ कळवाघे ,सरपंच सोयगाव सौ सरलाताई मांन्टे ,सरपंच वरूड सौ शिलाताई बुर्जे उपसरपंच दिलिप भाऊ निकम ,उपसरपंच संदीपभाऊ पैठने ,उपसरपंच सौ वैशालीताई पिंपळे, उपसरपंच सौ रंजनाताई पांडव तथा सर्व ग्रामपंचायत सदस्य व समस्त गावकरी मंडळी केसापुर, अटकळ, सोयगाव, वरूड येथील ग्रामस्थ उपस्थित होते.
Users Today : 21