खासदार मुकूलजी वासनिक 6 व 7 ला बुलडाणा जिल्हयात भारतजोडो यात्रा नियोजन आढावा होणा-या बैठकीला पदाधिका-यांनी उपस्थित रहावे –

Khozmaster
1 Min Read

चिखली: 03 नोव्हेंबर 2022अखिल भारतीय कॉग्रेस कमिटीचे सरचिटणीस खासदार मुकूलजी वासनिक हे येत्या 6 व 7 नोव्हेंबर रोजी बुलडाणा जिल्हयाच्या दौ-यावर येत आहे. दिनांक 6 नोव्हेंबर रोजी त्यांचे जिल्हयात शेगांव येथे आगमन होत असुन सकाळी 11ः30 वाजता भारतजोडो यात्रेच्या मार्गाची पाहणी, दुपारी 2ः30 वाजता संग्रामपुर येथे भारतजोडो यात्रे संदर्भात पूर्वतयारी बैठक, दुपारी 4 वाजता जळगांव जमोद येथे भारत जोडो यात्रे संदर्भात पूर्व तयारी बैठक, सायंकाळी 6 वाजता नांदुरा येथे भारतजोडो यात्रा संदर्भात आढावा बैठक, सायंकाळी 7ः30 वाजता नंादुरा येथील डिगांबर पहेलवान यांच्या घरी सात्वनपर भेट देणार असून नांदुरा येथे मुक्काम असणार आहे.खासदार मुकूलजी वासनिक हे बुलडाणा जिल्हा दौ-या दरम्यान दिनांक 07 नोव्हेंबर ला सकाळी 9ः30 वाजता मोताळा येथे भारतजोडो यात्रे संदर्भात पूर्वतयारी बैठक, सकाळी 11 वाजता तालुका चिखली सावरगांव डुकरे येथे माजी आमदार स्व. बाबुराव पाटील यांच्या निवासस्थानी सात्वंनपर भेट, दुपारी 1ः30 वाजता मेहकर येथे भारतजोडो यात्रे संदर्भात पूर्वतयारी बैठक, दुपारी 3 वाजता मेहकर येथुन खासदार मुकूलजी वासिकन नागपुर कडे प्रयान करतील. खासदार मुकूलजी वासनिक यांच्या 6 व 7 नोव्हेंबर रोजी आयोजित दोन दिवषीय भारतजोडो यात्रे संदर्भातील वरील पुर्वतयारी बैठकीला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन बुलडाणा जिल्हा कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार राहुलभाउ बोंद्रे यांनी केेले आहे.

 

0 9 4 6 7 1
Users Today : 21
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *