विकास कन्या श्वेता ताई महाले यांच्या पाठीशी उभे रहा बबन नाना जामदार, जेष्ठ भाजपा नेते

Khozmaster
9 Min Read

चिखली : राजकरणात माझे आयुष्य गेले पण कधी नव्हे एवढी विकास कामे चिखली विधान सभा मतदार संघात होत आहे. आ श्र्वेताताई महाले यांच्या प्रयत्नातून चिखली विधान सभा मतदार संघातील विकास कामे कोटींच्या कोटी उड्डाणे घेत आहे. आ सौ श्वेता ताई महाले पाटील या केवळ विकासच करीत आहे असे नसून कोणताही जात , पक्ष असा भेदभाव न करता सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन चालत असल्याने भविष्यात सर्वांनी आ सौ श्वेता ताई महाले पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांचे हात बळकट करण्याचे आवाहन जेष्ठ भाजपा नेते बबन नाना जामदार यांनी चिखली विधानसभा मतदार संघातील शक्ति/ बूथ प्रमुखांच्या संवाद मेळावा आणि चिखली नगर पालिका हद्दीतील विकास कामांच्या भूमिपूजन प्रसंगी अध्यक्षीय भाषण करताना केले.          दि 4 नोव्हेंबर 2022 रोजी चिखली शहरांतील मौनी बाबा मठात चिखली विधानसभा मतदार संघातील शक्ति/ बूथ प्रमुखांच्या संवाद मेळावा आणि चिखली नगर पालिका हद्दीतील विकास कामांच्या भूमिपूजन सोहळा संपन्न झाला.यावेळी सर्व प्रथम मान्यवरांच्या हस्ते भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच दिप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. नगर पालिकेतील 12 कोटी रुपयांच्या कामांचा भव्य भूमिपूजन कार्यक्रमआ. सौ. श्वेता ताई महाले पाटील यांच्या अथक प्रयत्नांनी चिखली विधान सभा मतदार संघातील ग्रामीण भागात ज्या प्रकारे विकास कामांचा झंझावात सुरु केला आहे . त्याच प्रमाणे चिखली नगर पालिका हद्दीत सुद्धा सर्वांगीण विकासासाठी त्या झटत आहेत. चिखली नगर पालिका हद्दीत आ सौ श्वेता ताई महाले पाटील यांनी विविध विकास कामांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या निधितून होणाऱ्या तब्बल 12 कोटी रुपयांच्या विवीध विकास कामांचा भूमिपूजन यावेळी करण्यात आले. जनतेची सेवा केल्यास शत प्रती शत भाजपा हे स्व. भाऊ साहेबांची स्वप्न पूर्ती होईल सेवा ही संघटन , सबका साथ सबका विकास या मुल मंत्र घेउन भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता सेवाभावी वृत्तीने काम करत आहे. भारतीय जनता पक्षाचे हे संघटन अनेक नेत्यांच्या त्यागातून मोठे झालेले आहे. सेवा हीच भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याची ओळख आहे. समर्पित भावनेने जनतेची सेवा करीत राहिल्यास शत प्रती शत भाजपा ही स्व. भाऊ साहेबांचे स्वप्न पूर्ती होईल असे सुद्धा आवाहन आ सौ श्वेता ताई महाले पाटील यांनी या संवाद मेळावा आणि भूमिपूजन सोहळ्यात बोलताना दिली.चिखली शहरासाठी 128 कोटी रुपयांच्या पाणी पुरवठा योजना प्रस्तावित आ. सौ. श्वेता ताई महाले पाटीलचिखली नगर वासियांना 15 – 15 दिवस पाणी पुरवठा होत नाही . धरणात पाणी आहे पण पाणी पुरवठा योजना जुनी असल्याने आणि वितरण व्यवस्था व्यवस्थित नसल्याने शहर वासियांना अनेक दिवस पाणी मिळत नाही. त्यामुळे नगर वासी विशेषतः महिला वर्गाला मोठा त्रास सहन करावा लागतो. यासाठी चिखली शहराला सुरळीत, मुबलक आणि दररोज पाणीपुरवठा करता येईल अशी 128 कोटी रुपयांची पाणी पुरवठा योजना शासन दरबारी सादर केलेली असुन सदर योजनेला लवकरच मान्यता मिळून चिखली शहर वासियांची कायम स्वरुपी पाणी टंचाई मधुन मुक्तता करण्यात येणार असल्याची ग्वाही आ सौ श्वेता ताई महाले पाटील यांनी या संवाद मेळावा आणि भूमिपूजन सोहळ्यात बोलताना दिली.सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांवर भाजपाचा झेंडा फडकला पाहिजे       त्या पुढे म्हणाल्या की, चिखली शहरासह विधान सभा मतदार संघात कोट्यावधी रुपयांची विकास कामे सुरु आहे. आपण आलेल्या प्रत्येक व्यक्तीचे कोणताही भेदभाव न करता कामे करीत आहोत. त्यामुळे चिखली विधान सभा मतदार संघातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांवर भाजपाचा झेंडा फडकला पाहिजे असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले. भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता नावाने नाही तर कमळाच्या नावाने ओळखला जावा*     केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे. सरकार आपले असल्याने अनेक लोकांची कामे आपण करत आहोत. भारतीय जनता पार्टी ही आपली ओळख आहे. लोकांची झालेली कामे पार्टी मुळे झाली हे सांगणे गरजेचे आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता स्वतःच्या नावाने नाही तर कमळाच्या नावाने ओळखला जावा असे सुद्धा आवाहन आ सौ श्वेता ताई महाले पाटील यांनी यावेळी केले आहे.चिखली न पा हद्द वाढीचा प्रस्ताव मान्य करून 66 कोटी रुपयांचा निधी मागणीचा प्रस्ताव सादर*अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली चिखली नगर पालिका हद्दीवाढीस मान्यता मिळाल्याने चिखली शहराला लागून असलेला भाग चिखली नगर पालिका हद्दीत समाविष्ट झालेला आहे. या भागात कधीही विकास न झाल्याने हद्द वाढ झालेल्या भागात विकासाचा प्रचंड अनुशेष निर्माण झालेला आहे. यासाठी हद्दवाढ भागातील मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी 66 कोटी रूपयांच्या निधी मागणीचा प्रस्ताव शासन दरबारी सादर केला असून त्या प्रस्तावास सुद्धा लवकरच मान्यता घेउन हद्दवाढ झालेल्या भागात लवकरच विकासाची कामे सुरू झाल्याचे दिसणार आहे.1000 कोटींच्या विकास कामांचे उद्दिष्ठ ठेवले आहे पंडितदादा देशमुख भाजपा शहराध्यक्षआ. सौ. श्वेता ताई महाले पाटील या चिखली विधान सभा मतदार संघातील प्रत्येक गावातील विकास कामांसाठी लागणाऱ्या निधी साठी झटत आहे. सोबतच चिखली नगर पालिका हद्दीतील कामासाठी सुद्धा प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहे. चिखली शहरासह त्यांनी प्रत्येक गावाचा विकास आराखडा तयार केला आहे. त्यात रस्ते, वीज , पाणी या मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी निधी उपलब्ध करून देत आहे. चिखली विधान सभा मतदार संघातील विकास कामांसाठी एक दोन , शंभर कोटी नव्हे तर किमान 1000 कोटी रुपयांचे टार्गेट ठेवलेले असल्याने चिखली शहराचे रूप बसलेले दिसेल असे भाजपा शहराध्यक्ष पंडीत दादा देशमुख प्रतिपादन यावेळी यांनी यावेळी केले आहे.चिखली न पा हद्द वाढीचा प्रस्ताव मान्य करून 66 कोटी रुपयांचा निधी मागणीचा प्रस्ताव सादर अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली चिखली नगर पालिका हद्दीवाढीस मान्यता मिळाल्याने चिखली शहराला लागून असलेला भाग चिखली नगर पालिका हद्दीत समाविष्ट झालेला आहे. या भागात कधीही विकास न झाल्याने हद्द वाढ झालेल्या भागात विकासाचा प्रचंड अनुशेष निर्माण झालेला आहे. यासाठी हद्दवाढ भागातील मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी 66 कोटी रूपयांच्या निधी मागणीचा प्रस्ताव शासन दरबारी सादर केला असून त्या प्रस्तावास सुद्धा लवकरच मान्यता घेउन हद्दवाढ झालेल्या भागात लवकरच विकासाची कामे सुरू झाल्याचे दिसणार आहे.

1000 कोटींच्या विकास कामांचे उद्दिष्ठ ठेवले आहे

पंडितदादा देशमुख भाजपा शहराध्यक्ष

आ सौ श्वेता ताई महाले पाटील या चिखली विधान सभा मतदार संघातील प्रत्येक गावातील विकास कामांसाठी लागणाऱ्या निधी साठी झटत आहे. सोबतच चिखली नगर पालिका हद्दीतील कामासाठी सुद्धा प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहे. चिखली शहरासह त्यांनी प्रत्येक गावाचा विकास आराखडा तयार केला आहे. त्यात रस्ते, वीज , पाणी या मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी निधी उपलब्ध करून देत आहे. चिखली विधान सभा मतदार संघातील विकास कामांसाठी एक दोन , शंभर कोटी नव्हे तर किमान 1000 कोटी रुपयांचे टार्गेट ठेवलेले असल्याने चिखली शहराचे रूप बसलेले दिसेल असे भाजपा शहराध्यक्ष पंडीत दादा देशमुख प्रतिपादन यावेळी यांनी यावेळी केले आहे.माझ्या सारख्या एका अल्प संख्याक माणसाला भाजपने मोठे केले हे माझे भाग्य ज्यांनी आपले आयुष्य काँग्रेस मध्ये घालविले त्यांना आतापर्यंत काँग्रेसने काहीही दिले नाही . परंतू भारतीय जनता पक्षाचे माझ्या सारख्या मुस्लीम समाजातील कार्यकर्त्याला जिल्हा स्तरीय पद दिले . नगर पालिकेत गत सलग पाच वर्षे उपाध्यक्ष पद दिले. त्यामुळे माझ्या सारख्या एका अल्प संख्याक माणसाला भाजपने मोठे केले हे माझे भाग्य समजतो असे भावनीक उद्गार यावेळी भाजपा अल्प संख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष शेख अनिस शेख बुढन यांनी यावेळी केले आहे. आ. सौ. श्वेताताई महाले मतदार संघाचा कायापालट करीत आहे सुरेश अप्पा खबूतरे कधी नव्हे ती कामे आ सौ श्वेता ताई महाले यांच्या कार्यकाळात सुरु झालेली आहे. प्रत्येक गावात विकासाचे काम सुरू आहे. त्यामुळे आ सौ श्वेताताई महाले मतदार संघाचा कायापालट करीत असल्याने प्रतिपादन भाजपा जेष्ठ सुरेश अप्पा खबूतरे यांनी यावेळी केले.यावेळी व्हॉईस ऑफ इंडिया च्या राज्य संघटक पदी नियुक्ती झाली म्हणून सत्कार लोकमत चे पत्रकार सुधीर चेके पाटील यांचा सत्कार करण्यात आला.  भारतीय युवा मोर्चाच्या वतीने a सौ श्वेता ताई महाले पाटील यांचा 21 फुटी भव्य हार घालून त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाम वाकदकर यांनी केले .यावेळी मंचावर रामकृष्ण दादा शेटे , प्रेमराजजी भाला संजय चेके पाटील ,सुधाकर काळे सुरेन्द्र पांडे ,अँड मंगेश व्यवहारे , देवीदास पाटील जाधव, श्रीरंगअण्णा वेन्डोले ,राजाभाऊ खरात ,रामदास भाऊ देव्हडे डॉ कुष्णकुमार सपकाळ , अनिश भाई जिल्हा अध्यक्ष,हरीकीशन वाधवाणी सुनिताताई भालेराव , अशोकजी अग्रवाल व्दारका ताई भोसले सुनंदाताई शिनगारे ,संतोष काळे, आशाताई घाटगे , अंबादास घाटगे , सुहास शेटे सर्व नगरसेवक, सर्व आघाड्याचे पदाधीकारी कार्यकर्ते बुथ प्रमुख/ शक्ती केन्द्र प्रमुख महीला भगिनी उपस्थीत होते.

0 9 4 6 7 1
Users Today : 21
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *