हिंगणी बू.येथे कृषी अधिकारी मिलींद वानखेडे याचा सत्कार संपन्न आजचा दिवस मी कधीच विसरू शकणार नाही =मिलिंद वानखेडे ,तालुका कृषी अधिकारी

Khozmaster
3 Min Read

रितेश टीलाव ततालुका प्रतिनिधी तेल्हारा  तालुका प्रतिनिधी अधिकाऱ्यांनी आपले कर्तव्य इमाने इतबारे पार पाडले तर कोणत्याही प्रकारच्या शेतकऱ्यांच्याअडचणी येत नाही अधिकाऱ्याची चांगली वागणूक पाहुन शेतकरी आपोआपच सहकार्याची भुमीका घेतात आपल्या चांगल्या कामाचा शेतकऱ्यांना फायदा होतो, तेच काम मी गत चार वर्षे पासून करीत शेतकऱ्यांसोबत जिवाभावाचे संबंध निर्माण केले, तेल्हारा तालुक्यातील शेतकऱ्यानी केलेले सहकार्य स्मरणीय असल्याने प्रतिपादन तेल्हारा तालुका कृषी अधिकारी मिलींद वानखेडे यांनी केले. तालुक्यातील हिंगणी बू. येथील शेतकऱ्यानी मिलींद वानखेडे यांची तेल्हारा येथुन बदली झाल्याने यांचा दिनांक 4 नोव्हेंबर रोजी सत्कार आयोजित केला होता त्यावेळी ते बोलत होते.या छोटेखानी संभारभाला तेल्हारा पंचायत समिती बी डी ओ भारासिंग चौहान , तेल्हारा तालुका कृषी अधिकारी नरेंद्र राठोड मंडळ कृषी अधिकारी गौरव राऊत , प. स्. सदस्य इद्रिस भाई,हिंगनी बु. येथील उपसरपंच सचिन कोरडे , , कृषि सहायक डांगे ,सेंट्रल बँक हिवरखेड चे शाखाधिकारी अनंत पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली.कार्यक्रमात राठी कृषी सेवा केंद्राचे संचालक विनय सेठ राठी कृषी परवेक्षक गजानन नागे, कृषी सहायक महेश इंगळे, डींगाबर ढगे , शंकर कोरडे , दीपक कोरडे,मंगेश कोरडे, भास्कर खानझोडे ,सुभाष कोरडे, एस नराजे ,गोपाल नराजे ,सोपान जवंजाळ, प्रमोद जवंजाळ यांची उपस्थिती होती. यावेळी शेतकऱ्यांना वेळोवेळी सहकार्य करणाऱ्या तालुका कृषी अधिकारी मिलींद वानखेडे यांचा शाल श्रीफळ देवुन सचिन कोरडेयांनी सत्कार केला तालुका कृषी अधिकारी मिलींद वानखेडे यांनी आपल्या कार्यकाळात तेल्हारा तालुक्यातील शेतकऱ्यांना वेळोवेळी सहकार्य केले, आवश्यक तेव्हा प्रत्यक्ष शेतावर जावुन शेतीची पाहणी करुन योग्य ते मार्गदर्शन केले या मार्गदर्शनामुळे कपाशी सोयाबिन आदी पिकाच्या कीड नियंत्रणात अधिक फायदा झाल्याचा मत सचिन कोरडे यांनी बोलताना सांगितले. तेल्हारा तालुका कृषी अधिकारी मिलींद वानखेडे यांनी शेतकऱ्यांना विविध योजना ची माहिती दिली त्याच्या अडचणी जावुन घेवून त्याचे प्रश्न मार्गी लावले एका चांगल्या अधिकाऱ्याला हा तालुका मुकला आहे ज्या प्रमाणे तालुका कृषी अधिकारी मिलींद वानखेडे यांनी या भागात कार्य केले तसेच कार्य नवनियुक्त कृषी अधिकारी नरेंद्र राठोड यांनी करावे असे मत यावेळी बी डी ओ भरतसिग चौहान यांनी केले. मिलिंद वानखडे यांनी या ठिकाणी कार्यरत असताना अधिकारी असल्याच्या तोरा कधीच दाखविला नाही . नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीशी राहणारे आणि शेतकऱ्याचे प्रश्न प्राथमिकतेने सोडणारे अधिकारी म्हणून वानखडे यांनी या ओळख निर्माण केली या सह विविध कामाचा या भागात ढसा उमटविला असल्याचे विनय सेठ राठीयांनी यावेळी बोलताना सांगितले .कार्यक्रमाचे सूत्र संचालन अनंत सरोदे यांनी .प्रास्ताविक महेश इंगळे तर आभार प्रदर्शन सचिन कोरडे यांनी केले.फेटा घालून ट्रॅक्टर चालवित वानखेडे यांचे कार्यक्रम स्थळी आगमन ,. शेतकऱ्याकडून वानखेडे यांचेवर पुष्प वर्षाव करण्यात आला ,शेतकऱ्यांनी स्वतःहून प्रथमता च कोण्या कृषी अधिकारी यांचे असे भव्य आगळे वेगळे स्वागत करण्यात आले मिलिंद वानखेडे यांनी या परिसरात नेहमी शेतकऱ्यांना मार्गदर्शन व सहकार्य केले असल्याचे मत यावेळी हिंगणी बू.येथील उपसरपंच सचिन कोरडे यांनी व्यक्त केले.

 

0 9 4 7 8 5
Users Today : 25
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *