काकडा आरती परिक्रमेमध्ये युवक बालगोपालांचा सहभाग

Khozmaster
1 Min Read

आलेगावा मध्ये काकडा आरतीची मांदियाळी योगेश नागोलकार राहेर:- आलेगाव येथील कानिफनाथ,श्री संत मिराआई,व गणेशगिर भजनी मंडळाच्या काकडा आरती गाव परिक्रमनामध्ये बालगोपालांसह युवक,वृद्ध मंडळींची मांदियाळी पातूर तालुक्यातील आलेगाव येथील कानिफनाथ,श्री संत मिराआई,गणेशगिर भजनी मंडळातर्फे कार्तिक मासामध्ये गावामधून परिक्रमन करीत प्रातःकाळी काकडा आरती वयस्क मंडळी काढायचे ती परंपरा जोपासत गेल्या काही वर्षांपासून येथील श्री कानिफनाथ महाराज,संत मिराआई व गणेशगिर महाराज भजनी मंडळाच्या वतीने बालगोपालांसह युवक व वयस्क मंडळी मोठया संख्येने प्रातःकाळी निघणाऱ्या काकडा आरती मध्ये मोठी मांदियाळी असते.तसेच प्रातःकाळी महिला घरासमोरील रस्त्याची साफसफाई करून रंगीबेरंगी रांगोळ्या टाकून घरा समोर श्री संत ज्ञानेश्वर महाराज,श्री गजानन महाराज यांच्या प्रतिमा खुर्चीवर ठेवून प्रतिमेचे पूजन करून काकडा आरतीतील भक्तांना गंधटिळा लावून स्वागत करतात.कार्तिक मासामध्ये चालणाऱ्या या काकडा आरती मध्ये हरिनामाच्या गजरासह संत तुकाराम महाराज,श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या ओव्यांचा गजर होत असल्याने गावातील वातावरण भक्तिमय होत आहे.भक्तमंडळी गावातील प्रत्तेक मंदिरासमोर हरिनामाचा गजर करीत असतात.काकडा आरती मध्ये बालगोपालांसह युवकांची वाढती संख्या गावकऱ्यांना गौरवास्पद वाटत आहे.

0 9 4 7 8 8
Users Today : 28
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *