श्री क्षेत्र वारी हनुमान मंदिर येथे तुलशी विवाह संपन्न

Khozmaster
2 Min Read

तेल्हारा तालुक्यातील शेवटचं टोक व सातपुड्याच्या कुशीत वसलेले श्री क्षेत्र वारी हनुमान मंदिर येथे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी कार्तिकी शुद्ध बारस दिनांक ४नोहेंबर२०२२शनिवार ला सालाबादप्रमाणे याही वर्षी तुलशी विवाह महंत कृष्णानंदजी भारती महाराज यांचे उपस्थित संपन्न झाला.सकाळी ८ वाजता दिलीप म्हसाये , दिपक राठी,शाम गिरी गोसावी, प्रदीप शर्मा ,यांचे हस्ते सपत्नीक यज्ञविधी पुजन करण्यात आले.यानंतर भगवान शालीग्राम मुर्तीची हरिणामाच्या गजरात पालखी मिरवणूक काढण्यात आली.मोठ्या संखेने भाविक सहभागी झाले होते,वाजत गाजत मिरवणूक लग्नमंडपात आल्यावर पुरोहित रूपेश व्यास यांनी विधीवत पुजा करून विवाह सोहळा पार पडला, यावेळी वारी हनुमान, पिंपरखेड ,सालोन , वारी भैरवगड, चुनखडी ,शेंबा, पिंगळी, घुंगटी ,आदी गावातील आदिवासी महिलांना , दरवर्षी प्रमाणे महंत कृष्णानंदजी भारती महाराज यांचे उपस्थित साडीचोळी वस्त्रांचा वाटप करण्यात आले.या विवाह सोहळ्याला वारी हनुमान, पिंपरखेड,सालोन,भैरवगड, दानापूर,वारखेड,सोगोडा ,सौदंळा, बोरखेड ,काकनवाडा ,सोनाळा, वडगाव वान ,चांगलवाडी, माळेगांव ,तेल्हारा ,वळोदा पानेरा, सुपो पळशी , काकनवाडा आदी गावातील हजारो महिला, पुरुष भाविकभक्त मोठ्या संख्येने तुलशी विवाह सोहळ्याला उपस्थित राहून महाप्रसाद लाभ घेतला.हनुमान भक्त मंडळ यांनी विशेष परिश्रम घेतले. गेल्या दोन वर्षांच्या कालावधी नंतर श्री क्षेत्र वारी हनुमान येथे तुलशी विवाह सोहळा संपन्न झाला .या तुलशी विवाह संपन्न झाल्या नंतरच विवाह सोहळे हिंदू धर्मात आयोजित केल्या जातात .श्री कृष्णांदजी भारती महाराज,श्री क्षेत्र वारी हनुमान तुलशी विवाह महत्त्व वनस्पतीच्या रोपाचे शालीग्राम किंवा विष्णू त्यांचे अवतार श्रीकृष्ण यांच्याशी विवाह प्रबोधानी एकादशी पासून करण्याची पूजोत्स प्रथा आहे. भगवान विष्णू कार्तिक महिन्यातील देवउठनी एकादशीला संपूर्ण चार महिने झोपल्यानंतर उठतात ,तेव्हा तुलशीची लग्न लावतात भगवान श्रीकृष्णाला तुलशी खूप प्रिय आहेत, तुळस ही लक्ष्मी स्वरूप मानले जाते. हिंदू धर्मात तुळशीला पापनाशिनी म्हणून अनन्य साधारण महत्त्व आहे. तुळस ही भारताच्या सर्व प्रांतात व सर्व भागात उगवणारी वनस्पती आहे बहुतेक हिंदू कुटुंबाच्या प्रत्येक घराच्या अंगणात तुळशी वृंदावन असते विष्णूचा तुळशीची विवाह लावण्याचा पूजोत्सव कार्तिक पासून पौर्णिमेपर्यंत एखाद्या दिवशी संध्याकाळी करतात पण मुख्यतः शीला करतात तुळशी विवाह एक व्रत मानले गेले हे वृत्त केल्याने कर्त्याला कन्यादानाचा फल मिळते असे मानले जाते.

0 9 4 7 8 8
Users Today : 28
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *