महेश इंगळे कृषी सहाय्यक रितेश कुमार टीलावत प्रतिनिधी तेल्हारा तेल्हारा तालुक्यातील दानापूर व हिंगनी बू येथे मिरची लागवडीस प्रारंभ झाला असून शेतकऱ्यांना सल्ला व मार्गदर्शन करण्याकरिता कृषी सहाय्यक महेश इंगळे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकरी डींगाबर ढगे व रवींद्र महादेव नाठे या शेतकऱ्यांना शेतात जाऊन भेटी दिल्या. महेश इंगळे यांनी मिरची लागवड व त्याचे व्यवस्थापन याची शेतकऱ्यांना माहिती पुढील माहिती दिली ती पुढील प्रमाणे आहे. शेतकऱ्यांना सांगितले की, मिरची साठी उष्ण किंवा दमट हवामानात अनुकूल असते. अश्या हवामानात मिरचीचे पीक अधिक चांगल्या प्रकारे येते. मिरचीची लागवड ही उन्हाळा, पावसाळा, हिवाळा या तिन्ही ऋतूमध्ये करता येते. पावसाळ्यात जास्त पाऊस आणि ढगाळ वातावरण असल्याने फुलांची गळ जास्त प्रमाणात होते. त्यामुळे पाने व फळे कुजण्याची शक्यता असते. मिरचीची वाढ २५ ते ३० अंश सेल्सिअस तापमानाला चांगली होते आणि उत्पादन ही भरपूर प्रमाणात निघते. मिरची पिकाच्या बियाण्यांची उगवण ही १८ ते २७ डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये उत्तम प्रकारे होते. पाण्याचा उत्तम निचरा होणारी मध्यम जमीन मिरची पिकाच्या लागवडीस ही अतिउत्तम असणार आहे. तसेच हलक्या जमिनीत योग्य प्रमाणात सेंद्रिय खते वापरल्यास अती जमीन मिरचीच्या पिकास योग्य ठरू शकते. पाण्याचा योग्य प्रमाणात निचरा होत नसेल, तर त्या जमिनीत मिरचीचे पीक अजिबात घेऊ नये. मिरचीसाठी मध्यम काळी आणि पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन ही शेतकऱ्याने निवडावी. कारण त्या जमिनीत पीक उत्पादन अधिक चांगले होऊ शकते. जर तुम्ही उन्हाळ्यात या पिकाची लागवड करण्याचे विचार करत आहात, तर मध्यम ते भारी जमिनीत मिरचीची लागवड करावी. तसेच जर तुमच्याकडे चुनखडी असलेली जमीन असेल, तर त्यामध्ये ही मिरचीचे पीक खूप चांगल्या प्रकारे येते.मिरची पिकाचे पाणी व्यवस्थापन –जर बागायती मिरची असेल, तर लागवडीच्या जमिनीप्रमाणे मिरची पिकाला पाणी द्यावे.मिरची पिकाला प्रमाणापेक्षा जास्त ही पाणी देऊ नये आणि कमी पाणी देऊ नये मिरचीची झाडे फुलावर आणि फळावर आले असताना, झाडांना पाण्याचा ताण द्यावा.रोपे लावणीनंतर दहा दिवसात शेतात रोपांचा जम बसतो. या काळात एक दिवसाआड हे रोपांना पाणी द्यावे.त्यानंतर एक आठवड्यात किंवा पाच दिवसांच्या अंतरानं मिरची पिकाला पाणी द्यावे.जर तुम्ही मिरची मिरची लागवड हिवाळ्यात करत असाल, तर हिवाळ्यात १०-१५ दिवसांच्या अंतराने मिरची पिकाला पाणी द्यावे.जर तुम्ही लागवड उन्हाळ्यात करत असाल, तर सहा ते सात दिवसांच्या अंतराने झाडांना पाणी द्यावे. तसेच कृषी सहाय्यक महेश इंगळे यांनी शेतकऱ्यांना मिरची लागवडीसाठी मल्चिंग पेपरचा वापर करण्याचे आवाहन सुद्धा यावेळी केले.
Users Today : 28