पातूर वन परिक्षेत्र अंतर्गत पक्षी निरीक्षण कार्यक्रम संपन्न

Khozmaster
1 Min Read

प्रतिनिधी रामेश्वर वाढी पातूर : पातूर वन परिक्षेत्र अंतर्गत पक्षी सप्ताहाची सुरुवात करण्यात आली आहे 5 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबर पर्यंत पक्षी सप्ताह साजरा करण्यात येत असतो. 5 नोव्हेंबर हा अभ्यासक साहित्यिक मारुती चित्तमपल्ली यांचा जन्म दिवस आहे, तर 12 नोव्हेंबर रोजी पक्षी अभ्यासक डॉ.सलीम अली यांची जयंती असून या पार्श्वभूमीवर पक्षी सप्ताह साजरा करण्यात येत आहे.   पातूर वन परिक्षेत्र अंतर्गत निसर्ग पर्यटन, पातूर व पातूर तलाव परिसरात आज दि. 6/11/2022 रोजी सकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत पक्षी निरीक्षण व पक्षी गणना वन विभातर्फे करण्यात आली आहे.यावेळी विविध प्रजातीच्या 26 पंक्षाचे नयनरम्य दृश्य उपस्थितांनी अनुभवले तसेच पक्षीमित्र व पक्षी अभ्यासक दीपक जोशी यांनी पक्षांची ओळख करून दिली व माहिती देऊन जागृती केली. या कार्यक्रमाला ए.सी.एफ. सुरेश वदोडे,आर.एफ.ओ. धीरज मदने,पक्षीमित्र तसेच पक्षी अभ्यासक दीपक जोशी,डॉ.अतुल मुंदडा,अरुण राठोड,नितीन बारताशे, पत्रकार सैय्यद साजिद, पत्रकार प्रमोद कढोणे,पत्रकार तथा सर्पमित्र स्वप्निल सुरवाडे उपस्थित होते.सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता पातूर वनविभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

 

 

0 9 4 7 8 8
Users Today : 28
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *