- माजी नगरसेवक सतीश इरतकर यांच्या तक्रारीची दखल..तक्रारी मुळे सर्वसामान्यांना न्याय मिळणार काय याकडे सर्वांचे लक्ष.. खोजमास्टर न्यूज च्या वृत्ताची दखल…. दिपक मापारी, रिसोड येथील माजी नगरसेवक सतीश इरतकर यांनी दिनांक 13 ऑक्टोबर 2022 व दिनांक 20 ऑक्टोबर 2022 रोजी जिल्हाधिकारी वाशिम यांना निवेदन देऊन नप्तेयांना निलंबित करा अशी मागणी केली होती मागणीच्या अनुषंगाने कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी दखल घेऊन दिनांक 31 ऑक्टोबर 2022 रोजी पत्रकाढून पत्र क्रमांक क्रकक्ष१/आस्था /प.स/कावी/८४६/२०२२ क्रमांकाचे पत्र उपविभागीय अधिकारी वाशिम यांना देऊन तसेच तक्रारीची प्रत देऊन सखोल चौकशी करून सविस्तर स्वयं स्पष्ट अहवाल तात्काळ कार्यालयात सादर करण्यात यावा. जेणेकरून सदर प्रकरण पुढील कारवाई करण्यासाठी सोईचे होईल असे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी पत्राद्वारे दिले तसेच पत्राची प्रत विभागीय कार्यालय अमरावती यांना देण्यात आली सदर प्रकरण थोडक्यात असे की रिसोड तहसील मध्ये संजय गांधी निराधार योजना समितीमध्ये नायब तहसीलदार म्हणून कार्यरतअसलेले नप्ते यांच्याकडे तहसील अंतर्गत विविध कामानिमित्त जाणारे संजय गांधी निराधार योजनेतील अपंग विधवा निराधार वयोवृद्ध नागरिक सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत त्यांच्या उद्धट वागणुकीमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी रिसोड चे माजी नगरसेवक सतीश इरतकर यांच्याकडे त्यांचा लेखाजोखा मांडला अशा गेंड्याचे मस्तक असलेल्या नायब तहसीलदार नप्ते यांच्यावर नियमानुसार कारवाई करून त्यांना त्वरित निलंबित करण्यात यावे अशी मागणी माजी नगरसेवक सतीश इरतकर यांनी तक्रारद्वारे जिल्हाधिकारी यांचेकडे नावाने केली होती. तक्रारीत असेनमूद केले होते की नायब तहसीलदार नप्ते हे मागील काही वर्षापासून कर्तव्यावर आहेत नप्ते यांच्याकडे सामान्य नागरिक कोणतेही काम घेऊन गेल्यास येणाऱ्या प्रत्येक नागरिकांशी उद्धटपणे वागून कोणत्याही कामाची सुरुवात ही की मी तुमच्या रिसोड सारखा वाईट तालुका पाहिला नाही व तुमच्या तालुक्यात लय रिकामटेकडे भरलेले आहेत. उठसूट आपले काहीही घेऊन येतात मला तुमचे कामे करणे एवढेच काम नाही मी तुमचा नोकर नाही. अशी उद्धट वागणूक सामान्य नागरिकांना नप्ते हे बोलून दाखवतात. तसेच मी मागील वीस वर्ष सेवा देऊन सरकारचा बाप झालो माझे कोणीही वाकडे करू शकत नाही अशा उद्धट व मनाला टोचणाऱ्या भाषेचा वापर करून त्यांच्या कार्यालयात कामानिमित्त येणाऱ्या सामान्य नागरिकांची कोणतीही समस्या ऐकून न घेता नायब तहसीलदार नप्ते हे वाद करत असतात. तसेच त्यांच्या कार्यालयात कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना वेगवेगळ्या धमक्या देऊन कार्यालयाबाहेर हाकलून सुद्धा देतात तसेच येणाऱ्या शेतकरी वर्ग. गोरगरीब . श्रमजीवी . तसेच वकील वर्ग सामान्य नागरिक राजकीय पक्षाचे पदाधिकारी या सर्वांशी नायब तहसीलदार नप्ते यांची असलेली वागणूक ही अतिशय त्रासदायक असून त्यांच्या वाईट वागणुकीमुळे सामान्य जनता ही त्रस्त झाली आहे तेव्हा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सदर बाबीची गंभीर्याने दखल घेऊन रिसोड तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार नप्ते यांना तत्काळ निलंबित करून त्यांच्यावर नियमानुसार कठोर कायदेशीर कारवाई करावी. तसेच रिसोड तालुक्यातील जनतेला न्याय द्यावा अशी मागणी माजी नगरसेवक सतीश इरतकर यांनी केली होती त्याची दखल जिल्हाधिकारी वाशिम यांनी घेतल्याने संजय गांधी निराधार योजनेतील गोरगरीब जनतेला न्याय मिळणार काय ? याकडे सर्व नागरिकाचे लक्ष लागले आहे..
Users Today : 1