समर्थ कृषी महाविद्यालयातर्फे आंतर महाविद्यालय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन संपन्न

Khozmaster
1 Min Read

तालुका प्रतिनिधी दत्ता हांडे डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत समर्थ कृषी महाविद्यालय देऊळगाव राजा तर्फे आंतर महाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धा झोन बी 2022 चे आयोजन विद्यापीठ मैदान अकोला येथे यशस्वीरित्या संपन्न झाले. या आंतर महाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धा आयोजनामागे महाविद्यालयाचे प्राचार्य नितीन मेहत्रे यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना क्रिकेट या मैदानी खेळाबाबत राष्ट्रीय नियमानुसार खेळ कशा प्रकारे खेळल्या जातो याबद्दल माहिती व्हावी तसेच कृषी विद्यापीठाने नमूद केल्यानुसार झोन बी अंतर्गत येणाऱ्या विविध कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या उदात्त हेतूने आंतर महाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धेचे आयोजन समर्थ कृषी महाविद्यालयातर्फे करण्यात आले होते, या आंतर महाविद्यालय क्रिकेट स्पर्धा अंतर्गत हिवरा आश्रम येथील विवेकानंद कॉलेज ऑफ ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट यांना झोन बी मधून फायनल साठी प्रवेश मिळाला,   आंतर महाविद्यालयीन क्रिकेट खेळाच्या समारोप प्रसंगी कृषी महाविद्यालय अकोला येथील सहयोगी अधिष्ठाता डॉ प्रकाश नागरे, कॉलेज ऑफ ॲग्रीकल्चर इंजीनियरिंग अकोला चे सहयोगी अधिष्ठाता डॉ सुधिर वडतकर, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ संदीप हाडोळे, डॉ विलास तांबे, डॉ प्रशांत नेमाडे, डॉ सचिन शिंदे, समर्थ कृषी महाविद्यालय जिमखाना प्रभारी प्रा मोहजितसिंह राजपूत, प्रा. शुभम काकड, प्रा. किरण ठाकरे, श्रीहरी काळुसे, गाभाजी लाड यांची उपस्थिती होती

 

0 9 4 7 8 8
Users Today : 28
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *