नंदुरबार मध्ये पहिल्यांदा घुमर महोत्सवाचे आयोजन…

Khozmaster
2 Min Read
प्रतिनिधी
प्रविण चव्हाण
मराठी सिनेतारकांची राहणार विशेष उपस्थिती..
नंदुरबार -: येत्या रविवारी म्हणजेच  २० नोव्हेंबरला दुपारी ४ वाजता नंदुरबार येथील जयचंद नगरामागील जागेत  घुमर महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
  या महोत्सवातून जागतिक राष्ट्रीय एकात्मता जोपासण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली .
   तसेच या महोत्सवाच्या आयोजनाने जागतिक पातळीवरच्या वर्ल्डबुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद होणार आहे .नंदनगरी येथे घुमर महोत्सव
आयोजन समितीच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली .
    याप्रसंगी राखी तवर , डॉ. तेजल चौधरी , प्रियंका माने , शितल चौधरी नंदा सोनार, प्रिती शर्मा, सुलभा महिरे, पुनम भावसार, मीनाक्षी भदाणे, दीपिका मुलाणी, निता पवार, राघिनी पाटील, मालती वळवी, सुप्रिया कोतवाल, विनिता चौधरी, ऐश्वर्या भामरे, जयश्री मराठे, कामिनी भोपे, भारती पवार,आदी उपस्थित होते .
      यावेळी संयोजकांनी सांगितले की , नंदुरबार जिल्ह्यात पहिल्यांदा घुमर महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे .
    या महोत्सवाची संकल्पना प्रियंका माने यांची असून स्थानिक जबाबदारी मुख्य आयोजक कुणाल वीर आणि  राखी तवर यांच्याकडे आहे .
  या महोत्सवात राजस्थानच्या लोकनृत्यासह नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी संस्कृतिकच्या लोकनृत्याचे सादरीकरण होईल .
   या महोत्सवाला मराठी सिनेतारीका अलका कुबल , मानसी नाईक , लोकप्रिय ट्रान्सजेंडर पूजा शर्मा , रेखा यांची विशेष उपस्थितीअसेल . तसेच लावणी किंग किरण कोरे हे देखील उपस्थित राहनार आहेत  .
   या महोत्सवासाठी ७ दिवसांचे प्रशिक्षण घेण्यात येत आहे . सुमारे ४ हजारापेक्षा अधिक महिला घुमर महोत्सव या एकाच व्यासपीठावर येवून विविध संस्कृतिचे दर्शन घडविणार आहे
    या महोत्सवात महिलांनी सहभागी व्हावे असे आवाहन नंदुरबार घुमर महोत्सवच्या संयोजकांनी केले आहे…
0 9 4 8 9 3
Users Today : 65
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *