-
मराठा महासंघाच्या पंढरपूर येथील सर्वसाधारण सभेत मोठया संख्येने युवकांनी सहभागी व्हा- सचिन शिंदे
*अकोट प्रतिनिधी विशाल गवई
अनेक महत्वपूर्ण विषय व नवीन पदाधिकारी निवड करण्यासाठी पंढरपूर येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठा महासंघाच्या सर्वसाधारण सभेला अकोला जिल्ह्यातील युवक पदाधिकारी आणि सभासदांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अखिल भारतीय मराठा महासंघाचे युवक जिल्हाध्यक्ष सचिन भाऊराव शिंदे यांनी केले आहे.
अखिल भारतीय मराठा महासंघाची सर्वसाधारण सभा रविवार दि. २० रोजी सकाळी ११:३० वाजता तनपुरे महाराज मठ,लक्ष्मी रस्ता, पंढरपूर या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे. या सर्वसाधारण सभेत २०२२ ते २०२५ करिता पदाधिकारी निवड करण्यात येणार आहे. सभेची सविस्तर नोटीस महासंघाच्या www.marathamahasangh.org या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.महासंघाच्या या सभेत अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांचा सत्कार करण्यात येणार आहे. तसेच महासंघाचे राष्ट्रीय अधिवेशन, महामंडळ योजना, उद्योजक घडविणे आदी महत्वपूर्ण विषयावर चर्चा होणार असल्याचे महासंघाचे सरचिटणीस राजेंद्र कोंढरे यांनी सदर नोटीस मध्ये नमूद केले आहे . तरी जिल्ह्यातील पदाधिकारी आणि सभासदांनी या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अखिल भारतीय मराठा महासंघाचे युवक जिल्हाध्यक्ष सचिन भाऊराव शिंदे यांनी केले आहे.
Users Today : 28