आ. सौ. श्वेता ताई महाले यांनी पीक विमा नुकसान भरपाईचे क्षेत्र वाढवून घेतले

Khozmaster
5 Min Read

शेतकरी संघटना नेते समाधान कणखर यावर्षी परतीच्या पावसाने सोयाबिन पिकांचे फार मोठया प्रमाणावर नुकसान झालेले आहे. अनेक शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला आहे. परंतू माहिती नसल्यामुळे नुकसान होऊनही अनेक शेतकऱ्यांनी क्लेम केले नाही . नुकसान झाल्याच्या ४८तासात तक्रारी न केल्याने पात्र असूनही ते शेतकरी नुकसान भरपाईस पात्र ठरू शकत नव्हते. परंतु आ सौ श्वेता ताई महाले पाटील यांनी जास्तीत जास्त शेतकरी पीक विमा साठी पात्र ठरले पाहिजे यासाठी आग्रह धरला. आणि आ सौ श्वेता ताई महाले यांनी पीक वीमा कंपनीला मानण्यास बाध्य केल्या मुळे पीकविमा साठी जास्तीत जास्त शेतकरी पात्रतेच्या यादीत घेतल्याने जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळणार असल्याचा दावा शेतकरी संघटना नेते समाधान कणखर यांनी अमडापुर येथील 2 कोटी रुपयांच्या रस्ता काँक्रिट कामाच्या भूमिपूजन सोहळ्या वेळी केली.       दि ५ नोव्हेंबर २०२२ रोजी दहिगाव मंगरूळ नवघरे ‘प्रमुख जिल्हा मार्ग 91’, किमी 10/00 ते 12/00, किंमत 75 लक्ष रुपये, या विकासकामाचे भूमिपूजन मंगरूळ नवघरे येथे, तर अमडापूर लव्हाळा दुसरबीड ‘राज्य महामार्ग 222’, किंमत 2 कोटी रुपये या विकासकामाचे अमडापूर येथे करण्यात आले.भूमिपूजन सोहळा आ सौ श्वेता ताई महाले पाटील यांच्या हस्ते पार पडला यावेळी पुढे बोलताना समाधान कणखर पुढे म्हणाले की,          सोयाबीनची भाव वाढ तेलबिया वरील स्टॉक लिमिट हटविल्यामुळे शेतकऱ्यांच्या घरात पीक येताच शेत पिकांचे भाव कमी होत होते . यावेळेस प्रथमच सोयाबीनची भाव वाढ सोयाबिन शेतकऱ्यांच्या घरात आल्यावर वाढत आहे . भारताचे पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने गत २नोव्हेंबर रोजी तेलबिया वरील स्टॉक लिमिट हटविल्यामुळे सोयाबीनचे भाव वाढ सुरू झाली आहे. येत्या काही दिवसांत सोयाबिनचे भाव मोठ्या प्रमाणात वाढतील अशी आनंदाची बातमी शेतकरी संघटना नेते समाधान कणखर यांनी यावेळी बोलताना दिली.एल्गार मोर्चा म्हणजे नौटंकी सोयाबिनचे भाव वाढत आहे. त्यासाठी केंद्र सरकारने तेलबिया वरील स्टॉक लिमिट हटविले म्हणूनच भाव वाढ होत आहे. परंतू काही लोक सुरु झालेली भाव वाढ एल्गार मोर्चा मुळे होत असल्याच्या वल्गना करीत आहेत. हे मोदी सरकारचे यश असल्याचे देखील त्यांनी सांगीतले तसेच‌ महाराष्ट्र शासनाने NDRF च्या निकषात वाढ केली राज्यातील एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने NDRF च्या निकषात तिप्पट वाढ केली. तसेच केलेली वाढ दोन हेक्टर वरून तीन हेक्टर पर्यंतची मर्यादा वाढविली त्यामुळे नुकसान भरपाई साठी राज्यातील अनेक शेतकरी पात्र ठरणार असल्याने शेतकरी संघटना नेते समाधान कणखर यांनी तेलबिया वरील स्टॉक लिमिट हटविल्या मुळे आणि राज्य सरकारने NDRF च्या निकषात वाढ केल्याने मोदी सरकार राज्य सरकार तसेच आ सौ श्वेता ताई महाले पाटील यांचे सुद्धा शेतकरी संघटना नेते समाधान कणखर यांनी यावेळी आभार मानले..अमडापुर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकाचे सौंदर्यीकरण करणार अमडापुर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य दिव्य अश्वारूढ पुतळा उभा आहे. परंतु चौकाचे सौंदर्यीकरण झालेले नाही .अमडापुर हे गाव मोठे असून त्या चौकाचे सौंदर्यीकरण करणे गरजेचे आहे. मागील काही लोकप्रतिनिधींनी आश्वासनं देऊनही चौकाचे सौंदर्यीकरण केलेले नाही . परंतू छ्त्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या सौंदर्यीकरण काम आमदार निधी मधुन करण्यात येणार असल्याची घोषणा आ सौ श्वेता ताई महाले पाटील यांनी यावेळी केली.होणारा रस्ता अमडापूर शहराच्या सौंदर्यात भर घालणारत्या पुढे म्हणाल्या की, अमडापूर लव्हाळा हा रस्ता अमडापूर गावातील ५०० मीटर लांबीेत काँक्रीटीकरण होणार असुन रस्त्यांची रुंदी १० मीटर असणार आहे. म्हणजेच जवळपास ३३ फूट रुंद असणार आहे. सदर रस्ता बांधकाम अमडापूर शहराच्या सौंदर्यात भर घालणार आहे .         या भूमिपूजन सोहळ्यास सर्वश्री शिवनारायण टक ज्येष्ठ कार्यकर्ते, शिवाजीराव देशमुख उपजिल्हा प्रमुख, कृष्णकुमार सपकाळ तालुका अध्यक्ष, भास्करभाऊ राउत, बबनराव गिन्हे, अर्जुन नेमाडे माजी तालुका प्रमुख, एकनाथ जाधव, अजयबापू देशमुख, शमशाद पटेल माजी उपसभापती, संतोष काळे तालुका अध्यक्ष युवा मोर्चा, संजय महाले जिल्हा सचिव भाजपा, भारत शेळके जिल्हा कार्यकारिणी सदस्य, अंकुशराव पाटील, समाधान कणखर, गणेशराव पाटील अंभोरे, विकास डाळीमकर जिल्हा कार्यकारिणी सदस्य, बंडू भाऊ अंभोरे जिल्हा सचिव युवा मोर्चा, विनोद सीताफळे तालुका सरचिटणीस भाजप, गजानन सोळंकी तालुका कोषाध्यक्ष भाजप, मा. गजानन देशमुख तालुका उपाध्यक्ष युवा मोर्चा, अनमोल ढोरे पाटील तालुका उपाध्यक्ष भाजपा, सुधाकर मोरे तालुका उपाध्यक्ष भाजप, भारत म्हळसने तालुका सचिव भाजप, भारत सोळंकी, राम जाधव जिल्हा सचिव किसान आघाडी, बबन राऊत, विजयजी अंभोरे, बंडू अंभोरे जिल्हा सचिव युवा मोर्चा, राजेश अमोरे तालुका अध्यक्ष किसान आघाडी, रमेश वाकडे, विनोद सीताफळे, दीपक मुरकुटे, दिलीप दादडे, श्रीकिसन कोकाटे, डॉ. दिलीप अंभोरे, विकास मोरे, प्रशांत पाखरे, अक्षय आदमाने युवा मोर्चा शहराध्यक्ष, सलीम भाई परवेज, सरपंच श्रीमती वैशालीताई गवई, सरपंच सौ. नलिनी जाधव, प्रवीण खंडेलवाल, गजानन देशमुख, अरूण पाटील, बंडू खरात, मदन दहातोंडे, महादेव उमाळे सरपंच, पुरुषोत्तम जाधव, गजानन छबीले, शिवा भागवत यांच्यासह पदाधिकारी व गावकरी मोठया संख्येने उपस्थित होते.

 

0 9 4 6 7 1
Users Today : 21
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *