स्थानिक गुन्हे शाखा व सिमा तपासणी पथकाची कारवाई : 38 लाख 70 हजार रुपये किमंतीची बेकायदेशीर विदेशी दारु व बियर जप्त..

Khozmaster
4 Min Read
प्रतिनिधी
प्रविण चव्हाण
नंदुरबार -: स्थानिक गुन्हे शाखा व सिमा तपासणी पथकाची कारवाई 38 लाख 70 हजार रुपये किमंतीची बेकायदेशीर विदेशी दारु व बियर जप्त.
    याबाबत सविस्तर माहिती अशी की, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी.जी. शेखर पाटील यांनी संपुर्ण नाशिक परिक्षेत्रात अवैध दारू तस्करांची माहिती काढुन त्यांचेवर कठोर कारवाई करण्याचे व अवैध धंद्यांचे समुळ उच्चाटन करण्याचे आदेश दिले होते .
    त्या अनुषंगाने नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक  पी . आर . पाटील यांनी त्याबाबतचे आदेश गुन्हे बैठकीत सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना निर्देश दिले होते .
     स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक  रविंद्र कळमकर यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की , दिनांक 06 नोव्हेंबर रोजी अंकलेश्वर बऱ्हाणपूर महामार्गावरून अक्कलकुवा मार्गे एका आयशर वाहनामधून किराणा सामानाच्यामागे अवैध देशी विदेशी दारु व बियरची चोरटी वाहतुक होणार आहे . त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पो. निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे सहा . पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांचे नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक तयार करुन त्यांना योग्य ते मार्गदर्शन करुन तात्काळ कारवाई करणे बाबत आदेशीत केले .
   स्थानिक गुन्हे शाखा व सिमा तपासणी नाक्याच्या पथकाने अंकलेश्वर बहऱ्हाणपूर महामार्गावर अक्कलकुवा पोलीस ठाणे हद्दीतील गव्हाळी सिमा तपासणी नाक्याजवळ सापळा लावला .
      दिनांक 06 नोव्हेंबर रोजी  सायंकाळी 05.00 वाजेच्या. सुमारास सिमा तपासणी नाका येथे मर्यादे पेक्षा जास्त भार असलेले आयशर वाहन आले म्हणून सिमा तपासणी नाक्यावरील स्थानिक गुन्हे शाखा व सिमा तपासणी नाक्यावरील पथकाने त्या वाहनास थांबवून वाहन चालकाला वाहनात काय भरले आहे ? व वाहनाचे कागदपत्र बाबत विचारपुस केली असता तो वाहन चालक उडवा उडवीची उत्तरे देवू लागला , म्हणून सिमा तपासणी नाक्यावरील पथकाने ते आयशर वाहन रस्त्याच्या बाजुला घेण्यास सांगितले . तसेच त्या आयशर वाहनाचे वजन केले असता त्यामध्ये प्रमाणापेक्षा जास्त वजन भरल्याचे दिसून आले . त्याच दरम्यान आयशर वरील वाहन चालकाने वाहन बाजुला घेवून तेथून पळ काढला . स्थानिक गुन्हे शाखा व सिमा तपासणी नाक्यावरील पथकाने वाहनाची पाहणी केली असता.
 त्यात खालील प्रमाणे दारु आढळून आली..
08 लाख 28 हजार रुपये किमंतीची MOUNT’S – 6000 SUPER STRONG बियरचे 500 एम . एल . चे एकुण 345 पत्राचे टिन व त्यामध्ये एकुण 8280 पत्राचे टिन .
 20 हजार 16 रुपये किमंतीची रॉयल ब्ल्यू माल्ट व्हिसकीचे एकुण 350 खोके , व त्यामध्ये एकुण 16,800 सिलबंद बाटल्या .
  26 हजार 400 रुपये किमतीचे मुरमुरे भरलेल्या प्लास्टीकच्या एकुण 88 गोण्या .
  10 लाख रुपये किमंतीचे आयशर वाहन क्रमांक MP – 09 GE – 6551 असा नंबर असलेले असा एकुण 38 लाख 40 हजार 400 रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त करुन अक्कलकुवा पोलीस ठाणे येथे आयशर वाहन क्रमांक MP – 09 GE – 6551  वाहन चालकाविरुध्द् महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे .
     सदरची कारवाई, प्रभारी पोलीस अधीक्षक  प्रशांत बच्छाव यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक  रविंद्र कळमकर , सहा . पोलीस निरीक्षक  संदीप पाटील , पोलीस उप निरीक्षक  अनिल गोसावी , पोलीस हवालदार मुकेश तावडे , सजन वाघ , मनोज नाईक , जितेंद्र अहिरराव , अविनाश चव्हाण , किरण मोरे , तुषार पाडवी यांचे पथकाने केली आहे .
0 9 4 8 9 3
Users Today : 65
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *