बंधारा,अलवान,पाडळपूर, जुवाणी,छोटा धनपूरच्या ग्रा.पं पदाधिकाऱ्यांच्या समावेश
माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते सत्कार
नंदुरबार :-तळोदा तालुक्यातील शेकडोंच्यावर कार्यकर्त्यांसह छोटाधनपूर,अलवान, जुवाणी, पाडळपूर,बंधारा या ५ ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिंदे गटात जाहीर प्रवेश केला. यावेळी रघुवंशी यांनी त्यांच्या सत्कार केला.
नंदुरबार येथे काल रविवारी श्री छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरात तळोदा तालुक्यातील शेकडोंच्यावर कार्यकर्त्यांनी त्याचप्रमाणे छोटाधनपूर ग्रामपंचायतीचे सदस्यांसह कार्यकर्ते, अलवानचा सरपंचांसह सर्व सदस्य,जुवाणीचे माजी सदस्यांसह विद्यमान सदस्य,पाडळपूरचे उपसरपंच,बंधाराचे सरपंच, उपसरपंचांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी कार्यकर्त्यांना गमछा भेट देऊन स्वागत केले. याप्रसंगी जिल्हाप्रमुख ॲड.राम रघुवंशी, जिल्हाप्रमुख किरसिंग वसावे, उपजिल्हाप्रमुख गौतम जैन, उपजिल्हाप्रमुख रवींद्र गिरासे, तळोदा तालुकाप्रमुख अनुप उदासी शहर प्रमुख जगदीश परदेशी जि प सदस्य देवमन पवार, जि.प सदस्य प्रतिनिधी भाऊसाहेब शिंत्रे, विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन मधुकर पाटील, भाऊसाहेब माळी,अमृत पावरा मंगल पाडवी आदी उपस्थित होते.
गाव विकासासाठी प्रयत्न व्हावे;माजी आ चंद्रकांत रघुवंशी
ग्रामपंचायतिच्या पदाधिकाऱ्यांनी गावाच्या विकासासाठी प्रयत्न करावेत. रस्ता,वीज,पाणी प्रश्नांवर गांभीर्याने दखल घ्यावी.तळोदा तालुक्यातील अनेक गावांमध्ये बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या शाखा उघडायचा आहेत. शाखेचे नियोजन कार्यकर्त्यांनी करण्याचे आवाहन माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी केले.
यांनी केला प्रवेश
छोटाधनपुर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच बाबूलाल पवार, सदस्य जिजाबाई पवार, योगेश पवार, माजी पोलीस पाटील नारायण वसावे,ग्रुप ग्रामपंचायत अलवानचे सरपंच सुभाष वळवी, सदस्य धीरसिंग वळवी, विनस राहसे, जलसिंग वळवी,वसंती ठाकरे,अनिता वळवी, राजूबाई पवार, मिसूबाई वळवी, कुंदाबाई वळवी, जुवानी ग्रामपंचायत सदस्य मगन ठाकरे,रूमा मोरे, अंबुलाल वळवी,प्रमुख मार्गदर्शक प्रवीण कुलकर्णी,राजू पवार, बंधारा ग्रामपंचायतचे सरपंच मधुकर ठाकरे,उपसरपंच नितीन ठाकरे, पाडळपूरचे उपसरपंच सुरेश मोरे, छोटाधनपुरचे माजी सरपंच बाबुलाल पवार,सदस्य जिजाबाई पवार,योगेश पवार, माजी पोलीस पाटील नारायण वसावे यांच्यासह शेकडोंच्यावर कार्यकर्त्यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केला.
Users Today : 65