तालुका प्रतिनिधी दत्ता हांडे डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला संलग्न समर्थ कृषी महाविद्यालय देऊळगाव राजा येथे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भारत सरकार डॉ भागवतजी कराड यांनी नुकतीच सदिच्छा भेट दिली. या भेटी प्रसंगी श्री गजानन महाराज कृषी व शैक्षणिक संस्था चे अध्यक्ष देवानंद कायंदे, सचिव सौ नंदाताई कायंदे, संचालक तथा जि. प सदस्य मनोज कायंदे, संचालक सतीश कायंदे यांनी डॉ भागवजी कराड साहेब यांचा सत्कार केला, याप्रसंगी सत्काराला उत्तर देताना डॉ भागवतजी कराड यांनी आपल्या राजकीय प्रवासाची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली तसेच कुठल्याही परिस्थितीत जनसामान्याचे काम करण्यास मी बांधील आहे असे देखील सांगितले, यावेळी परिसरातील ज्येष्ठ नेते शेषरावजी डोईफोडे यांचे स्वागत डॉ भागवतजी कराड यांनी केले. याप्रसंगी समर्थ कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य नितीन मेहत्रे व कर्मचारी यांनी कराड साहेबांचे पुष्पहार घालून स्वागत केले, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समर्थ औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य प्रफुल्ल ताठे यांनी केले, या कार्यक्रमास रमेश कायंदे, सुभाष दराडे, डॉ संजय नागरे, गणेश डोईफोडे, समाज बांधव व सर्व कर्मचारी उपस्थित होते.
Users Today : 24