नळव्या रस्त्यावरील रेल्वे बोगदा नागरिकांसाठी खुला;माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते उद्घाटन

Khozmaster
3 Min Read
वाहतुकीची कोंडी सुटणार; बोगद्याच्या कामाला रेल्वेचे प्रशासनाचे दुर्लक्षच…
प्रतिनिधी
प्रविण चव्हाण.
नंदुरबार :-बहुप्रतिक्षित असलेल्या नळवा रस्त्यावरील रेल्वे बोगदा मंगळवारी गुरुनानक जयंतीचे औचित्य साधून नागरिकांसाठी खुला करण्यात आलेला आहे. बाळासाहेबांच्या शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते बोगद्याचे उद्घाटन करण्यात आले. बोगद्याच्या कामाला नेहमी रेल्वे प्रशासनाचं दुर्लक्षचं झाल्याच्या आरोप रघुवंशी यांनी केला आहे
नंदुरबार शहरातील नळवा रस्त्यावर रेल्वे मार्ग खालून भुयारी मार्ग काढण्यात आलेला आहे. यासाठी माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या सततच्या पाठपुराव्यातून २ कोटी ८६ लक्ष रुपयांच्या राज्य शासनाने निधी दिला होता. नंदुरबार शहरातील ४० टक्के वसाहत ही रेल्वे रुळापलीकडील असल्याने वाहतुकीच्या दृष्टिकोनातून नागरिकांचे हाल थांबावेत म्हणून निवडणुकीच्या वेळेस माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी मतदारांना बोगदा बनवून देण्याचे आश्वासन दिले.
शहरातील रेल्वे उड्डाण पुलावरील सततच्या वाहतुकीच्या कोंडीने नागरिक कंटाळले होते. रेल्वे पलिकडील वसाहतीत जाण्यासाठी दुसरा मार्ग नळवा रस्त्यावरील रेल्वेच्या जुना बोगद्याच्या मार्गावरून देखील वेळोवेळी वाहतूक विस्कळीत होत होती. कायमसाठी वाहतुकीच्या प्रश्न मिटवण्यासाठी माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी पुढाकार  घेत राज्य शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करीत २ कोटी ८६ लक्ष रुपयांच्या निधी प्राप्त करून नगरपालिकेच्या माध्यमातून रेल्वे प्रशासनाकडे हस्तांतरित केला. असे असतांना रेल्वेचे या प्रश्नाकडे नेहमीच दुर्लक्ष राहिलेले होते. मागील वर्षीचा पावसाळ्यानंतर बोगद्याचे काम पूर्ण व्हायला पाहिजे होते. परंतु, रेल्वेपणाच्या दुर्लक्षामुळे रेंगाळत गेले.
वाजत गाजत रॅली काढून उद्घाटन
काल मंगळवारी  सकाळी ११ वाजता बाळासाहेबांच्या शिवसेनेचे नेते,माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते फीत कापून बोगद्याचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी नंदुरबार तालुका विधायक समितीचे व्हा. चेअरमन मनोज रघुवंशी, उपनगराध्यक्ष कुणाल वसावे, पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील, नगरसेवक यशवर्धन रघुवंशी, शिक्षण सभापती राकेश हासानी, नगरसेवक परवेज खान, दीपक दिघे, रवींद्र पवार,गजेंद्र शिंपी, प्रमोद शेवाळे, फारुख मेमन,रियाज कुरेशी,फरीद मिस्त्री, जगन्नाथ माळी, चेतन वळवी,मोहित राजपूत, अविनाश माळी आदी उपस्थित होते.
बोगद्यासाठी नगरपालिकेच्याच पुढाकार
वेळोवेळी पाठपुरावा करून राज्य शासनाने नळवा रस्त्यावरील रेल्वे बोगद्यासाठी निधी मंजूर करून नगरपालिकेने रेल्वे प्रशासनाकडे वर्ग केला होता.तरीसुद्धा रेल्वे प्रशासनाचा दुर्दैवाने या कामासाठी तब्बल आठ वर्ष लागले. आता देखील काम अर्धवट सोडून दिले होते. पावसाळ्यात बोगद्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचते. गेल्या अनेक दिवसापासून रेल्वे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे बोगद्यामध्ये पाणी साचून मोठ्या प्रमाणावर घाणीचे साम्राज्य निर्माण झाले होते. नगरपालिकेच्या पुढाकारातून साचलेले पाणी काढून पूर्णतः साफसफाई करून नागरिकांच्या सेवेत बोगदा समर्पित करण्यात आला.
चंद्रकांत रघुवंशी, माजी आमदार
उधणा  ते भुसावळ रेल्वे मार्गावरील सर्वच बोगदे सदोष
वेळोवेळी नगरपालिकेने बोगद्यासाठी रेल्वे प्रशासनाला निधी दिला तरी कामाला सुरुवात होत नव्हती.८ वर्ष  कामाला सुरुवात झाल्यानंतर पूर्ण करण्यासाठी गती दिली जात नव्हती. रेल्वे सारखे जबाबदार खात्याकडून बोगद्याच्या कामाला शेवटपर्यंत निष्क्रियता दाखवण्यात आली.उधाण ते भुसावळ रेल्वे मार्गावरील सर्वच बोगदे सदोष आहेत. याकडे नेहमी रेल्वे विभागाने दुर्लक्ष केल्याची टीका माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केली.
0 9 4 8 9 3
Users Today : 65
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *