कोरोना महामारीत मायबाप गेले, सर्वस्वचं हरवले, आभाळ कोसळले …..

Khozmaster
4 Min Read

आषा फाउंडेषनने दत्तक घेतलेल्या त्या अनाथांना शब्द पाळीत दिला मायेचा आधार  

खा.वासनिकांच्या हस्ते उच्च षिक्षणासाठी दोघांना प्रत्येकी 1 लाख तर चौघांना प्रत्येकी 50 हजाराचे दिले धनादेष      

आशा फाउंडेषनने कोरोना महामारीत पालकत्व गमावलेल्या जिल्हयातील 15 बालकांना घेतले होते दत्तक

 उच्च षिक्षण व अल्पवयीन गटातील बालकांच्या संगोपनासाठी घेतला होता पुढाकार

आषा फाउंडेषनचे सचिव राहुलभाउ बोंद्रे यांनी सर्व स्तरातून मदतीचे केले होते आवाहन

 आषा फाउंडेषनच्या या सामाजिक पुण्यकार्याचा आदर्ष इतरांनी घ्यावा

चिखली: कोरोना महामारीने जगाच्या पाठीवर नैसर्गीक कहर करीत मृतदेहांचा खच्च पाडला होता, या मुत्यू तांडवातुन बुलडाणा जिल्हाही सुटला नाही. जिल्हयात कोरोनाने आई-वडील, आजी आजोबांचे पालकत्व गमावलेल्या तब्बल 7 कुटूंबातील 15 निराधार झालेल्या निरागस बालक/बालीकांना शैक्षणीक व संगोपालना करीता त्यांच्या जिवनात आषेचा किरण निर्माण करण्यासाठी पुढाकार घेतला. अखिल भारतीय कॉग्रेस कमिटीचे सरचिटणीस खा. मुकूलजी वासनिक हे अध्यक्ष तथा बुलडाणा जिल्हा कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार राहुलभाउ बोंद्रे सचिव असलेल्या सामाजिक स्तरावर कार्य करणा-या ‘‘आषा फाउंडेषन’’ ने या बालकांना दत्तक घेत त्यांचे शिक्षण व संगोपालनाची जबाबदारी दत्तक स्वरूपात घेतली होती. दिलेला शब्द पाळीत फाउंडेषनने नांदुरा येथील भारतजोडो यात्रेच्या आढावा बैठक प्रसंगी खा.मुकूलजी वासनिक यांच्या हस्ते उच्च षिक्षणासाठी दोघांना प्रत्येकी 1 लाख रूपये तर चौघांना प्रत्येकी 50 हजार रूपयाचे धनादेष देत आर्थीक दुष्टया मदतीचा हात दिला आहे. यामुळे पालकत्व गमावलेल्या या निरागस बालकांवर आभाळ कोसळलेल्या दुःखाला मायेची उब मिळाल्याने त्यांचे संगोपालन व शैक्षणीक वाट सुकर झाली आहे.  आषा फाउंडेषनने दत्ताक घेतलेल्या 15 बालकांपैकी उच्च षिक्षण घेत असलेल्या मलकापुर प्रषांत नगर येथील विद्यी रविंद्र शर्मा व प्रणव रविंद्र शर्मा या दोघांना प्रत्येकी 1 लाखाचा तर 13 ते 15 वर्ष वयो गटातील लांडणापुर तालुका संग्रामपुर येथील आम्रपाली राजु सोनुने, आचल राजु सोनुने,तसेच सुटाळा तालुका खामगांव येथील प्रियांषी अमोल भाग्यवंत व जानव्ही अमोल भाग्यवंत या चौघांना प्रत्येकी 50 हजार रूपयाचे धनादेष खासदार मुकूलजी वासनिक यांच्या हस्ते, माजी आमदार राहुलभाउ बोंद्रे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थिीत त्यांच्या स्वाधीत केले आहे.  जिल्हयातील पालकत्व गमावलेले सात कुटूंबातील 13 बालके 15 वर्ष वयोगटापेक्षा लहान असुन ते प्राथमीक षिक्षण घेत आहेत. तर 2 बालकांनी उच्च षिक्षणासाठी प्रवेष घेतला आहे. त्यापैकी एक एम.बी.बी.एस. ला षिक्षत घेत आहे तर दुसरी बालीका ही चार्टेट अकाउंटंट, ;सी.ए.द्ध चे षिक्षण घेत आहे, उच्च षिक्षण घेणा-या या दोघांना प्रत्येकी 1 लाख रूपये मदत षिक्षणासाठी देण्याचे ठरले होतेे. तर उर्वरीत 13 बालकांना षिक्षण व संघोपनासाठी प्रत्येकी 50 हजार रूपये देण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. सदरहु बालकांना पुढील षिक्षणासाठी मदत करून त्यांच्या जगन्याला उभारी देण्याच्या दृष्टीकोनातुन आषा फाउंडेषनच्या वतीने व्यवसायीक प्रषिक्षीत करण्यात येणार आहेत. आषा फाउंडेषनच्या बैठकीत सदर निर्णय घेतला त्यावेळी फांउडेषनचे अध्यक्ष मुकुलजी वासनिक साहेब, उपाध्यक्षा सौ.पुष्पाताई बोंडे अमरावती, कोषाध्यक्ष माजी आमदार बाबुरावजी पाटील, सचिव राहुलभाउ बोंद्रे, विष्वस्त मुक्त्यारसिंग भाउ राजपुत, विजय अंभारे, संजय राठोड,सौ. सुनिताताई गावंडे यांची उपस्थिती होती. या मुलांपैकी काहींनी आई -वडीलांबरोबरच आजी आजोबा ही गमावले आहेत हे येथे उल्लखणीय.कोरोना महामारीत अनेकांना आपले प्राण गमवावे लागले, कुटूंबाचा कर्ता व मायेची सावली मुत्युमूखी पडली ते दुःख निशब्द करून जाणारे, जिल्हयातील आई वडीलांचे छत्र गमावलेल्या बालकांच्या जिवनाला उभारी देण्याकरीता आषा फाउंडेषने घेतलेल्या पुढाकाराला मदतीचा हात देण्याचे आवाहन फाउंडेषनचे सचिव मा.आ.राहुलभाउ बोंद्रे यांनी केले होते. त्या आवाहानाला जिल्हाभरातुन आमदार राजेष एकडे, श्यामभाउ उमाळकर, दिकप देषमाने, अॅड. हरीष रावळ, स्वातीताई वाकेकर, देवानंद पवार, अनुराधा परिवारातील संपुर्ण कर्मचा-यांचा एक दिवसाचा पगार, यासह अनेक दात्यांनी मदतीचा हात देत उस्फुर्त प्रतिसाद दिला होता हे विषेष.

0 9 4 6 7 4
Users Today : 24
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *