लोखंडी पट्ट्या लंपास , अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल.

Khozmaster
1 Min Read

प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार –: नवापूर शहरातील रंगावली कॉलनी येथे पाटबंधारे कार्यालयाच्या बंद कर्मचारी वसाहतीचे उघडा दरवाज्याच्या रुममधून चोरट्याने पाणी अडविण्यासाठी वापरल्या जाराऱ्या ३२ हजार रुपये किंतीच्या १६ लोखंडी पट्ट्या चोरुन नेल्या .       याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार , नवापूर शहरातील रंगावली कॉलनीत पाटबंधारे कार्यालयाचे असलेल्या कर्मचारी वसाहतीत रुम आहे . सदर रुमच्या उघडा असलेल्या दरवाजातून चोरट्याने आत प्रवेश करुन रुममधून कोल्हापुरी सिमेंटच्या बंधाऱ्यामधील पाणी अडविण्यासाठी असलेल्या ३२ हजार रुपये किंमतीच्या १६ लोखंडी पट्ट्या चोरुन नेल्या . याबाबत जितेश सखाराम गावित यांच्या फिर्यादी वरुन नवापूर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात भादंवि कलम ३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास पोहेकॉ.दादाभाई वाघ करीत आहेत .

0 9 4 8 9 3
Users Today : 65
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *