विद्युत वितरण कंपनी दुरुस्तीची कामे कधी करणार- नारायण आरु…

Khozmaster
2 Min Read

दिपक मापारी, रिसोड वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील रिठद विद्युत उपकेंद्र अंतर्गत शेतातील विद्युत पोल काही तुटले, काही आडवे झाले, कोठे तारा तुटल्या, या तक्रारीचे शेतकऱ्याचे प्रमाण रिठद विद्युत उपकेंद्र अंतर्गत खूपच प्रमाणात आहेत परंतु त्या तक्रारीच्या प्रती विद्युत वितरण कंपनी वाशिमकडे काही प्रमाणातच पाठवल्या परंतु जास्त तक्रारी रिठद येथेच पडुन आहेत त्यामुळे शेतकऱ्यांची ही दुरुस्तीची होणारी कामे रब्बी हंगामात होणे शक्यच नाही.असेच दिसते. त्यामुळे शेतकरी आसमानी व सुलतानी संकटात सापडलेला असतानाच विद्युत वितरण कंपनीने रब्बी हंगामात हे संकट निर्माण केले व त्यातच या शासनाने शेतकऱ्याला प्रति असलेला द्वेष व त्यामुळे या होणाऱ्या कामात संबंधित ठेकेदाराला आदेश देण्यात आले नाहीत.नियोजन विभागाच्या भोंगळ कारभारामुळे ही कामे रखडली म्हणूणच या रब्बी हंगामात अल्प प्रमाणात शेतकऱ्यांना उत्पन्न होणार आहे याला सर्वस्वी दोषी विद्युत वितरण कंपनी आहे याबाबत ढोरखेडा येथील शेतकरी भारत शामराव सावले यांचा गट नं.१२३,यांच्या शेतात स्पेशल डीपी असून त्या डीपीचा विद्युत पुरवठा पोल पडल्यामुळे खंडित झाला. त्यामुळे पाणी असून सुद्धा शेतीला पाणी देऊ शकत नाही. या शेतकऱ्याने अधीक्षक अभियंता विद्युत वितरण कंपनी वाशिम यांना 20/ ७/ 2022 ला व १/१० 2022 ला दिलेल्या निवेदनात पोल पडल्याची माहिती दिली व विद्युत पुरवठा खंडित असल्याचे सांगितले त्याचप्रमाणे जर विद्युत पुरवठा सुरळीत न झाल्यास फाशी घेण्याची वेळ येणार आहे. असे नमूद केले त्यामुळे विद्युत वितरण कंपनी या शेतकऱ्यांचे रिठद विद्युत वितरण कंपनी अंतर्गत येत असलेल्या सर्व तक्रारदार शेतकऱ्यास न्याय देईल का ? हा प्रश्न निर्माण होत आहे, तरी शासन, प्रशासन व विद्युत वितरण कंपनी जागे होईल व सर्वांना न्याय देईल अशी अपेक्षा सामाजिक कार्यकर्ते नारायणराव यांनी अपेक्षा ठेवली आहे

 

0 9 3 7 2 0
Users Today : 1
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *