हजारों परिवारांच्या चेहऱ्यावर आनंदी क्षण देत जयअनंत मोहत्सव संपन्न..!!

Khozmaster
3 Min Read
अँड.नकुल देशमुखांच्या संकल्पने जनतेचा भरघोस प्रतिसाद..बचत गट व समूहाना भरघोस मिळकत….
दिपक मापारी, रिसोड
रिसोड अँड.नकुल देशमुख यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या जयअनंत महोत्सव दिनांक ८ नोव्हेंबर रोजी संपन्न झाला हजारो परिवार व नागरिकांनी भेट देऊन आनंदी क्षण जगले महाराष्ट्र राज्यात पहिल्यांदाच एक आगळी वेगळी संकल्पना मनाशी बाळगून अँड.नकुल देशमुख यांनी जयअनंत महोत्सवाच्या माध्यमातून साकार केली.हजारोच्या संख्येने परिवारानी महोत्सवास भेट दिली.महोत्सवाचे उदघाटन माजी मंत्री माजी खासदार अनंतराव देशमुख,रिसोड पोलीस स्टेशनचे ठाणेदार ठाकूर साहेब, सौ जयश्रीताई देशमुख,अँड.नकुलदादा देशमुख,चैतन्य भैया देशमुख,मालेगाव कृषि उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती गजाननराव देवळे,माजी जिल्हा परिषद सदस्य गजाननराव लाटे, रिसोडच्या नगराध्यक्षा सौ विजयमाला कृष्णाजी आसनकर व मान्यवरांच्या हस्ते व उपस्थितीत पार पडला होता.आपली लोप पावत असलेली जुनी संस्कृति,कला,जुन्या काळातील गावाचे दृश्य,बचत गट व विविध समूह यांनी तयार केलेली उत्पादने यांची विक्री व प्रदर्शन याचा भरघोस खरेदीचा आनंद घेतला व मोठ्या प्रमाणात चविष्ट व चमचमीत पदार्थाचा आस्वाद घेतला.परिवारासोबत आपल्या ग्रामीण व कृषी संस्कृतीचा आनंद घेता येईल असा हा महोत्सव हजारो नागरिक व असंख्य परिवाराच्या चेहऱ्यावर आनंद देणारा ठरला.जुन्या ग्रामीण गावातील देखावे, ऐतिहासीक संदर्भ देणारे वस्तू,मंदिरे,संस्था,जुने खेळ,जुन्या कला,जुने व्यवसाय,शेती,शेतात काम करणारी शेतकरी कष्टकरी,शेतकरी महिला,मजूर,जुन्या काळात होणारी लग्न कार्यक्रम देखावा,मंदिराच्या माध्यमातुन प्रसिद्ध संस्थांनचा व संतांचा इतिहास,शालेय शिक्षण संस्थेचा इतिहास,गौरव,प्रगती नालौकिकी,१०० वर्ष पूर्वीचे भांडे,वस्तू यांचा विविध कलेत प्रदर्शन,विविध जुन्या नृत्य कला यांचा आनंद घेत परिसरातील मंडळी व असंख्य परिवार यांनी कौतुक करत त्यांचा लहानग्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या अप्रतिम कलेला दाद दिली.परिवारासहीत विविध १००  स्टॉलवर खरेदी करत विविध खाद्य पदार्थाचा आस्वाद ही घेतला यावेळी या जयअनंत महोत्सव २०२२ मधे गोरगरीब,कष्टकरी ,शेतकरी,व्यापारी,व्यावसायिक,महिला समूह,शासकीय कर्मचारी, शासकीय अधिकारी,सर्वच पक्षांचे नेते, पदाधिकारी,कार्यकर्ते,विविध स्थानिक स्वराज्य संस्थांचे सदस्य,अध्यक्ष उपाध्यक्ष,उद्योजक, प्रगतशील शेतकरी यांनी भेट देऊन या महोत्सवाचा मनमुराद आनंद घेतला.या सर्व महोत्सवात असलेल्या सर्व कलेमध्ये दि आर्य शिक्षण संस्था रिसोड,कृषि महाविद्यालय रिसोड च्या तब्बल ५०० विद्यार्थ्यांनी उत्कृष्ठ अभिनयानी महोत्सवाची रंगत वाढविली.माजी खासदार अनंतराव देशमुख,सौ.जयश्रीताई देशमुख यांनी भेट देणाऱ्या परिवाराशी सवांद साधले.ज्यांच्या संकल्पनेतून हा जयअनंत महोत्सव साकार झाले ते युवा नेते अँड.नकुलदादा देशमुख यांनी या दरम्यान संपूर्ण वेळ भेट देणाऱ्या परिवाराशी हितगुज करत त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद अनुभवला.व प्रत्येक स्टॉल धारकास भेट. दिली.प्रसंगी चैतन्य भैया देशमुख यांची सुद्धा महोत्सवास उपस्थिती होती.या महोत्सवात विक्री व प्रदर्शन साठी सहभागी झालेल्या स्टॉल ची मोठया प्रमाणात विक्री झाली व मोठ्या प्रमाणात दर्जेदार उत्पादनाचा प्रचार,प्रसारही हजारो लोकां पर्यंत पोहचला.बचत गट विविध समूह यांची स्टॉलच्या माध्यमातुन लाखो रुपयांच्या उत्पादनाची व खाद्य पदार्थांची लाखो रुपयांची विक्री झाली.असंख्य परिवरांची भेट,हजारोंची गर्दी,मनमोहक दृश्य,देखावे,अप्रतिम जुन्या कलांचे सादरीकरण,कृषि परंपरा सादरीकरण आयोजकांचे उत्कृष्ठ नियोजन या सर्वांच आनंद परिवारासह घेत व आनंदी क्षण अनुभवत दिनांक ६   नोव्हेंबर रोजी सुरुवात झालेला हा हजारो चेहऱ्यावर आनंदी क्षण देणारा हा जयअनंत महोत्सव तीन दिवसानंतर ८ नोव्हेंबर ला संपन्न झाला.
0 9 3 7 1 9
Users Today : 25
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *