शिवाजी महाराजांच्या चुकीच्या इतिहासाला मनसेची मुख संमती आहे का ? पाटील प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी चित्रपट सांस्कृतिक विभाग

Khozmaster
2 Min Read

मुंबई-चित्रपटातल्या विसंगतींवरती सातत्याने मनसे चित्रपट सेना अनेक वेळा वेगवेगळे आंदोलन करून सिनेमे बंद पाडण्यात अग्रेसर असते. मग कधी महाराष्ट्रातल्या ऐतिहासिक पुरुषांच्या झालेल्या अपमानाचा विषय असोत, की अशा कुठल्यातरी चित्रपट मधील एखादे दृश्य जे मनसेला मान्य नसलेल्या विषयावर आधारित चित्रपटाला बंद पाडण्याचा विषय असो. ही मंडळी सातत्याने चित्रपट बंद पाडण्यात अग्रेसर असते. मात्र अख्या महाराष्ट्रात या दोन चित्रपटांबद्दल गोंधळ माजला असतानाच मनसे मात्र मुंग गळून गप्प आहे. त्याचं कारणही असा आहे की दोन्ही चित्रपटांना मनसेने खंबीर पाठिंबा दिला आहे मग व्यक्ती आणि सोयीचे विषय पाहूनच मनसे आपला स्टॅन्ड घेते का? असा प्रश्न बाबासाहेब पाटील यांनी उपस्थित केला आहे.ऐतिहासिक पुरुषांमध्ये चुकीच्या पद्धतीने इतिहास सादर केला जात असताना सुद्धा मनसे चित्रपटाला चित्रपटासारखच बघावं असं का म्हणते, मग बाकी सिनेमांना आपण विरोध करतो त्यावेळेस त्यांना सुद्धा आपण चित्रपट म्हणून का बघत नाही. एखाद्या चित्रपटाच्या निर्मात्याने करोड रुपये खर्च करून चित्रपट बनवताना तो चित्रपट म्हणूनच जर बघितला तर तो व्यवसायाच्या अनुषंगाने सुद्धा आपण बघू शकतो. मात्र अशावेळी मनसे आक्रमक होऊन अशीच सिनेमे सुद्धा बंद पडतात. मग महेश मांजरेकर आणि हर हर महादेव च्या टीमला राज ठाकरे यांनी केलेला पाठिंबा म्हणजे शिवाजी महाराजांच्या चुकीच्या इतिहासाला मनसेची मुख संमती आहे का?असा सुद्धा प्रश्न यावेळी उपस्थित होतो. जर असं असेल तर मग महाराष्ट्रात इतिहासाची चुकीची मांडणी करून लोकांना संभ्रमात टाकण्यात मनसे सुद्धा हातभार लावतो का? असे अनेक प्रश्न बाबासाहेब पाटील यांनी मनसेला विचारले आहेत? शिवाजी महाराज चे महाराजांचे आराध्य दैवत आहे आणि शिवाजी महाराजांची मावळे दिवस-रात्र एकत्र करून त्यांच्या इतिहासाला पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न करतात जेणेकरून महाराष्ट्राला व इथल्या राजकारणाला सातत्याने बळ मिळाले पाहिजे म्हणून नोसेने सुद्धा नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तत्कालीन शूरतेचा प्रतीक असलेला झेंडा लावला आहे. ही बाब महाराष्ट्रासाठी भूषणव आहे मात्र चुकीचा इतिहास दाखवून राज ठाकरे अशा विकृत चित्रपटांना हातभार लावत असतील तर तर मनसेने आपली भूमिका स्पष्ट शब्दात मांडावी अशी अपेक्षा बाबासाहेब पाटील यांनी व्यक्त केली आहे

 

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *