टाळकरी मृदुगाच्या तालावर हरिनामाच्या गजरामध्ये पालखीची गावातून मिरवणूक… 

Khozmaster
1 Min Read
योगेश नागोलकार राहेर
आलेगाव  येथील श्री कानिफनाथ महाराजाच्या मंदिरा परिसरामध्ये भागवत सप्ताहाची सांगता भाविक  भक्तांना महाप्रसाद वितरणाने करण्यात आली.ई वी सन १२ व्या शतकातील पुरातन काळातील कानिफनाथ महाराज महाराष्ट्र्भर भ्रमण करीत असताना एकांतात असलेल्या आलेगाव येथील पूर्वीकाळी महादेवाच्या मंदिरामध्ये काही दिवस ध्यानस्थ बसून सदर गावाला त्यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या आलेगाव येथील श्री कानिफनाथ महाराज  मंदिरामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून कार्तिक मासामध्ये भागवत सप्ताहाचे आयोजन केले जाते.तीच परंपरा जोपासत १नोव्हेंबर ते ७ नोव्हेंबर पर्यंत भागवत कथेचे आयोजन करण्यात आले होते.भागवत कथेचे पारायण ह.भ.प नंदू इंगळे महाराज यांनी ७ दिवस केले.तर दि ८ रोजी कार्तिक पौर्णिमा दिवशी श्री कानिफनाथ महाराज यांचा पालखी सोहळा, टाळकरी मृदुगाच्या तालावर हरिनामाच्या गजरामध्ये गावातून मिरवणूक काढण्यात आली.या वेळी ग्रामस्थ महिलांनी घरासमोर रांगोळ्या टाकून पालखीचे स्वागत करून दर्शनाचा लाभ घेतला.त्याचप्रमाणे दहीहंडी फोडून गोपाळ काल्याच्या प्रसादाचे वितरण करून दुपारी महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.महाप्रसादाचा शेकडो भाविक भक्तांनी लाभ घेतला.सदर महाप्रसादाचा कार्यक्रम ग्रामस्थांच्या मदत कार्याने पार पडला.
0 9 4 7 8 8
Users Today : 28
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *