प्रतिनीधी रवि मगर
पळसखेड सपकाळ : नातेवाईक तथा समाजानेही जवळ जवळ नाकारलेल्या व त्यामुळेंच अत्यंत दु:खद व दुर्लक्षित जीवन जगणाऱ्या मनोरुग्णांच्या सेवेसाठी आपले जीवन समर्पित करणाऱ्या डॉ. नंदकुमार पालवे यांनी बुलढाणा जिल्ह्यातील पळसखेड सपकाळ या छोट्याशा खेड्यात सुरू केलेल्या एका पर्णकुटीच्या सेवा-संकल्प नामक मनोरुग्ण सेवाश्रमाचे आज भव्य अशा वैद्यकीय वसाहतीत रूपांतर झाले असून त्यांनी त्यांच्या तेवढ्याच समर्पित सहकारी आरती ताई पालवे यांच्या सह हा सेवा-शुश्रूषेचा रथ सतत सुरू ठेवला आहे. त्यांच्या या मानवीय मनोरुग्ण सेवा कार्याची दखल घेऊन बहुजन साहित्य संघ, चिखलीच्या वतीने २०२१ चा – फुले-शाहू-आंबेडकर – पुरस्कार त्यांना घोषित केला असून दि. २०-११-२०२२ रोजी चिखली येथील महाराजा अग्रसेन रिसॉर्ट मध्ये आयोजित करण्यात आलेल्या बहुजन साहित्य संमेलन-२०२२ मधे हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे. आणि सदर पुरस्कार स्वीकारण्यासाठी सदर संमेलनात ऊपस्थित रहावे असे निमंत्रण पत्र संघाचे अध्यक्ष ॲड. विजयकुमार कस्तुरे, चिखली, संघटक/निमंत्रक बबन महामुने आणि सचिव शाहीर मनोहर पवार यांनी डॉ. पालवे तथा सौ. आरती पालवे यांना ता. ०५-११-२०२२ रोजी प्रदान केले.
Users Today : 24