रमेश पाटील नांदुरा (श्रीकांत हिवाळे):-.
गोठा बांधकामा साठी सन २०२२-२३ मधे शासनाकडून शरद पवार गुरांचा गोठा या योजने अंतर्गत ७७ हजार रुपये अनुदान शेतकऱ्यांना शासनाकडून मिळते.या योजनेतून नांदुरा तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपल्या गोठ्याचे काम पूर्ण केले.परंतु ज्या शेतकऱ्यांनी दिनांक ५ मे, ६ मे २०२२ रोजी गोठ्याचे काम पूर्ण केले परंतु त्यांना आज पर्यंत शासनाकडून मिळणारे अनुदान मिळाले नाही. व ज्या शेतकऱ्यांनी दिनांक ०२/०९/२०२२ ला गोठ्याचे काम पूर्ण केले अशा शेतकऱ्यांना त्यांच्या अनुदानाचे पूर्ण पैसे जमा झाले.हा काय प्रकार आहे याची विचारणा करण्याकरिता मी प्रकल्प अधिकारी श्री बोदडे साहेब यांच्याकडे गेलो असता प्रकल्प अधिकारी बोदडे साहेब यांनी मला सांगितले की गोठ्याचे पैसे लवकर मिळण्यासाठी ज्यांनी १५ हजार रुपये दिले त्यांचे पैसे लवकर जमा झाले.कारण आम्हाला वर गटविकास अधिकारी पासून ते जिल्हा परिषद बुलढाणा येथील लिपिक श्री बळी साहेब यांना सुद्धा पैसे द्यावे लागतात तेव्हा गोठ्याचे पैसे लवकर खात्यात जमा होतात. अशा पद्धतीची शेतकऱ्यांची लूट ही नांदुरा पंचायत समिती मार्फत होत आहे.आजही जे शेतकरी यांची आर्थिक देवाणघेवाणची मागणी पूर्ण करू शकले नाही अशा अनेक शेतकऱ्यांच्या पैसे आज ही रोखून ठेवण्यात आले आहे.ही गंभीर बाब असून आपण तक्रार केली तर आपले अनुदान मिळणार नाही या भीतीपोटी शेतकरी अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांची तक्रार करण्यास धाजवत नाही परंतु यामधील भ्रष्टाचार उघड होईल असे पुरावे माझ्याकडे आहेत. यामधे जुन्या तारखेत पूर्ण झालेल्या गोठ्याचे पैसे प्रलंबित व ४-५ महिने उशिरा पूर्ण झालेल्या गोठ्याचे पूर्ण अनुदान मिळाले यांचे प्रकल्प अधिकारी बोदडे साहेब यांच्या सही शिक्क्यानिशी असलेले पक्के पुरावे माझ्याकडे असून अनुदानापासून वंचित शेतकऱ्यांना सोबत घेऊन वरिष्ठांकडे लेखी तक्रार करणार असल्याचेही मा.शिवसेना तालुका प्रमुख रमेश पाटील यांनी म्हटले.शेतकऱ्यांच्या महत्त्वपूर्ण विषयाला वाचा फोडून जोपर्यंत यात शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही व अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई होणार नाही तोपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचे रमेश पाटील यांनी म्हटले आहे.
Users Today : 25