सुरक्षा कीट विना खाजगी वायरमनचा जीव धोक्यात , महावितरणाचे दुर्लक्ष..

Khozmaster
2 Min Read
प्रतिनिधी प्रविण चव्हाण
नंदुरबार -:नंदूरबार येथे सुरक्षा कीट विना खाजगी वायरमनचा जीव धोक्यात टाकून पोलवर चढविण्यात येते . या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही . महावितरण नेहमीच या त्या कारणाने चर्चेत राहतं , कधी ग्राहकांकडून अवाजवी वीज बिले आकारणी तर कधी अंदाजे वीजबिले यामुळे अनेकदा ग्राहकांच्या रोषाला देखील महावितरणला सामोरे जावे लागते . बऱ्याचदा याबाबत ग्राहकांकडून तक्रारी करून देखील याची महावितरण करून दखल घेतली जात नाही . यामुळे बऱ्याचदा वाद देखील उद्भवतात . मात्र आता महावितरण चा एक अनोखा प्रकार समोर आला आहे . महावितरण कडून खाजगी वायरमनला नियुक्ती करून थेट पोलवर चढविण्यात येते . मात्र खासगी वायरमन पोलवर चढत असताना त्याला कोणत्याही प्रकारचे ग्लोज किंवा सुरक्षा कीट न पुरविता पोलवर चढवण्यात येत असल्याने अपघात घडण्याची शक्यता आहे . अशा प्रकारचे अपघात बऱ्याच ठिकाणी घडलेले असताना देखील महावितरणाने यातून कोणताही धडा घेतलेला नाही . यामुळे अपघातात जीव गेल्यास याला जबाबदार कोण असा सवाल देखील या निमित्ताने उपस्थित केला जात आहे . दरम्यान नंदुरबार तालुक्यातील कोपर्ली तसेच बयाने परिसरात देखील अशा घटना घडल्या होत्या . महावितरण कर्मचारी विद्युत पोलवर चढलेले असताना अचानक वीज पुरवठा सुरू झाल्याने अमळथे येथील वीज पोलवर चढलेल्या कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता . या घटनेस आता वर्षाचा कालावधी देखील पूर्ण झालेला नाही .
   तोच महावितरणने या दुर्घटनेतून कोणताही धडा न घेतल्याने अपघाताची शक्यता वाढली असून यातून एखाद्याचा जीव जाण्याची देखील शक्यता आहे . सुरक्षा किटविना कर्मचारी विद्युत पोलवर चढल्यास त्याचा जीव गेल्यास याची जबाबदारी महावितरण घेणार का ? असा देखील सवाल उपस्थित केला जात आहे .यामुळे नेहमीच हलगर्जीपणा करणाऱ्या महावितरण कंपनीने सदरची बाब गांभीर्याने घेऊन सुरक्षिततेसाठी किट पुरवाव्या अशा अपेक्षा देखील या निमित्ताने व्यक्त केल्या जात आहेत .
0 9 4 8 9 3
Users Today : 65
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *