प्रतिनिधी प्रविण चव्हाण
नंदुरबार -: तळोदा शहराबाहेरील रस्त्यावर गुटख्याला महाराष्ट्रात बंदी असतांनाही विक्री करण्याच्या दृष्टीने वाहतूक केला जात असताना तळोदा पोलिसांनी 1 लाख 87 हजार 410 रुपये किमतीचा गुटखा व अॅपेरिक्षा रिक्षासह 2 लाख 87 हजार 410 रूपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे .
तळोदा गावाबाहेरील रस्त्यावर गायत्री वॉटर फिल्टरजवळ अन्सारी शब्बीर अहमद मोहम्मद तैय्यब ( वय 41 , रा . हाफीज सिद्दिकीनगर धुळे ) हा दि .7 रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास आपल्या ताब्यातील ॲपेरिक्षा ( क्र.एम.एच .15 ईजी 748 ) मध्ये यात महाराष्ट्रात प्रतिबंधीत विमल गुटखा , पान मसाला , तंबाखूची अवैधरित्या विक्री करण्याचा उद्देशाने चोरटी वाहतूक करताना आढळून आला .
सदर मुद्देमाल हा मानवी आरोग्यास हानीकारक असल्याचे माहित असताना कब्जात बाळगताना मिळून आला . म्हणून तळोदा पोलीसात भादंवि कलम 328 , 188 , 273 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे . सदर इसमाजवळ दोन खाकी रंगाच्या गोणीत 77 हजार 792 रुपये किमतीचे 416 विमल पान मसाला , 27 हजार 456 रुपये किमतीचे प्लास्टिक पोत्यात 208 पाऊच , तानसेन प्लेवड पान मसाला प्रत्येकी किंमत 2000 रूपयेप्रमाणे 35 पाऊच एकुण किंमत 7000 रूपये , हिरा पान मसाला किंमत 120 रूपये प्रमाणे 60 पाऊच एकुण किंमत 7200 रुपये ,महा रॉयल तंबाखू किंमत 30 रुपये प्रमाणे 60 पाऊच एकुण किंमत 1800 रूपये , विमल पान मसाला प्रत्येकी किंमत 120 रूपये प्रमाणे 52 पाऊच किंमत 6240 रुपये , व्ही वन प्रत्येकी किंमत 22 रुपये 220 पाऊच किंमत 4840 रुपये , प्रिमीयम एक्स एल 01 जाफरानी जर्दा 30 रुपये प्रमाणे 208 पाऊच एकुण किंमत 6240 रुपये , प्रिमियम जर्दा किंमत 50 रुपये प्रमाणे 37 पाऊच एकुण किंमत 1850 रुपये , व्ही – 1 तंबाखू 33 रूपये प्रमाणे 416 पाऊच एकुण किंमत 3432 रुपये , विमल पान मसाला प्रत्येकी किंमत 198 रुपये प्रमाणे 220 पाऊच एकुण किंमत 43 हजार 560 रूपये , सोबत अॅपेरिक्षा किंमत 1 लाख रुपये असा एकूण 2 लाख 87 हजार 410 रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला . पुढील तपास पोलीस निरीक्षक पंडीतराव सोनवणे यांच्या आदेशानुसार पोहेकॉ सुधीर गायकवाड यांच्याकडे सोपविण्यात आला .पिंटु अहिरे , तपास अधिकारी सपोनि अविनाश केदार हे करत आहेत .
Users Today : 65