रेशन दुकानदार व ग्राहक त्रस्त.लाभार्थ्यांना मजुरीचा फटका.
आलेगाव दि ३०प्रतिनिधी पातूर तालुक्यात रेशन धान्य वाटप करण्यासाठी शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आलेली ई पॉस मशीन कनेक्ट होत नसल्यामुळे,धान्य वाटपात मोठा खोडा निर्माण होत आहे.यामुळे ग्राहकासह दुकानदार त्रस्त होत आहेत.
शासनाने गेल्या काही वर्षांपासून धान्य भ्रष्टाचाराला आळा बसावा व रेशन वितरण पारदर्शक पद्धतीने करण्यासाठी रास्त स्वस्त धान्य दुकानदारांना धान्य वाटपा करिता ई पॉस मशीन उपलब्ध करून दिली.सदरील मशीनचे कंत्राट एका कंपनीकडे शासनाने दिले आहे.वर्जन १ वर सुरुवातीला मशीन सुरळीत सुरू होती.मात्र कंपनीने मशीनमध्ये अधिकचे बदल केल्यामुळे मशीनमध्ये विविध तांत्रिक अडचणी निर्माण होत आहे.त्यामुळे मशीन धीम्या गतीने चालत आहेत.त्यामुळे तालुक्यातील अनेक रेशन लाभार्थ्यांना दिवाळीच्या पर्वावर राशन मिळवणे कठीण झाले होते.तसेच दुकानदारांनी सुध्दा दिवसभर दुकाने सुरू ठेऊन धान्य वितरणाचा प्रयत्न केला.परंतु कनेक्टिव्हिटी व्यवस्थित चालत नसल्यामुळे,आजही अनेक ग्राहक रेशन दुकाना समोर ग्राहकांची गर्दी दिसून येत आहे.यामध्ये अनेक ग्राहकांना शेतमजुरी पाडून धान्य मिळवण्यास विलंब होत आहे.
खेडे गावातील ग्राहक दुकानदार हैराण आलेगावा पासून काही किमी अंतरावर असलेल्या पांढुरणा,जांब,चोंढी,पिंपळडो ळी, अंधार सांगवी गावंडगाव, चिखलवाड आदी गावे जंगलपरिसरा मध्ये असल्याने ग्राहक व दुकानदारांना कनेक्टिव्हिटीच्या त्रासामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
आलेगावातील दुकान क्र 32 मध्ये किट उपलब्ध झाली असून ग्राहकांना वितरित करणे सुरू आहे.परंतु रास्त दुकान क्र 31 व 33 क्रमांक असलेल्या दुकानांमध्ये दि 29 ऑक्टोबर पर्यंत किटच उपलब्ध झाली नव्हती त्यामुळे ग्राहकांना किट अभावी परतावे लागत आहे.
दुकान क्र 32 मध्ये एकुन कार्डधारकांची संख्या 662 असून दि 29 तारखे पर्येंत 300 ग्राहकांना धान्याचे वितरण करण्यात आले.तसेच
रास्तस्वस्त धान्य दुकान क्र 31मध्ये एकुन कार्डधारक संख्या 576 असून 29 तारखे पर्यंत 50 कार्डधारकांचे वाटप बाकी होते.तर दुकान क्र 33 मध्ये 500 कार्डधारकांची संख्या असून 350 कार्डधारकांना धान्याचे वितरण करण्यात आले.महिन्याची शेवटची तारीख संपत आल्याने धान्याचा लाभ लाभार्थ्यांना मिळणार की नाही हा संभ्रम ग्राहकांमध्ये आहे.
धान्य वाटपाची तारीख वाढवून देण्याची मागणी केली आहे.तारीख वाढवून मिळेल.
पुरवठा निरीक्षक पातूर
व्ही.बी.ताले
Users Today : 28