नांदेड ते शेगांव भारतजोडो पदयात्रेत चिखलीतून पदाधिकारी सहभागी

Khozmaster
2 Min Read

चिखली:  दि.09 नोव्हेंबर 2022
दिवसेदिवस बहुप्रचलीत ठरत असलेल्या ऐतिहासीक भारतजोडो यात्रेत आपला सहभाग नोंदविण्याकरीता बुलडाणा जिल्हा कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार राहुलभाउ बोंद्रे यांच्या निर्देषानुसार चिखली शहरामधुन माजी नगरसेवक सचिन बोंद्रे, माजी नगराध्यक्षपती किषोर कदम, विजय भोयर सर हे देगलुर नांदेड येथुन प्रदेष यात्री म्हणुन भारतजोडो यात्रेत सहभागी झाले आहे. या यात्रेत दिवसागणीक सहभागी होणा-या यात्रेकरूंची संख्या वाढतच आहे.
भारतजोडो यात्रेच्या प्रवासात हजारो यात्रेकरू कॉग्रेस नेते खासदार राहुलजी गांधी यांच्या सोबत चालत आहेत. रस्त्याच्या दुतर्फा अबालवृध्द पुरूष,महिलांची अलोट गर्दी उसळल्याचे पाहवायास मिळत आहे. खासदार राहुलजी गांधींनी देषाचे संविधान वाचविण्याबरोबरच देषातील नागरीकात सर्वधर्म समभाव बंधुत्वाची भावना निर्मीती वाढीस यावी म्हणुन कन्याकुमारी ते काष्मिर हया भारतजोडो यात्रेचे आयोजन केले आहे. राष्ट्रीय स्तरावरील असामान्य नेतृत्व सुरक्षा व्यवस्थेचे कवच बाजुला सारून या प्रवासात सर्व सामान्यांषी एकरूप होतांना, त्यांच्याषी चर्चा करतांना दिसुन येत असतांनाचे कुतूहल या मानसाच्या मोठया दिलाचे दर्षन घडवून जात आहे. त्याचबरोबर राहुलजी गांधी रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या शेतीमध्ये रब्बी हंगामाच्या पेरणीत मषगुल असलेल्या बळीराजाला अलीगन देवून त्याच्या जगण्याला उभारी देतांना देसून येतात. खासदार राहुलजी गांधी यांच्या स्वागतासाठी भल्यामोठया कमानी उभ्या करण्यात आल्या असुन पदयात्रेकरूंना पाणी, फळवाटप, नियोजनबध्द पध्दतीने करण्यात येत असतांना वयोवृध्द महिला राहुल गांधीच्या डोक्यावरून मायेचा हात फेरतानांचे दृष्य डोळयाचे पारणे फेडतात अषा स्वरूपाची प्रतिक्रीया कॉग्रेसचे युवा नेते तथा कृषीमित्र सचिन बोंद्रे यांनी याप्रसंगी भ्रमणध्वनीवरून बोलतांना व्यक्त करीत तरूणांनी भारतजोडो यात्रेत मोठया संख्येने सहभागी होवून खासदार राहुलजी गांधी यांचे हात बळकट करावे असे आवाहनही यावेळी सचिन बोंद्रे यांनी केले आहे.

0 9 4 6 7 4
Users Today : 24
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *