चिखली: दि. 09 नोव्हेंबर 2022
भारतीय राष्ट्रीय कॉग्रेसच्या चिखली शहर अध्यक्ष पदी सलग तिस-यांदा अतहरोद्यीन काझी यांची निवड केली आहे. अध्यक्ष पदाची धुरा यषस्वी सांभाळीत पक्षाचे संघटन मजबुत केल्याने त्यांच्या कार्याची दखल घेत पक्षश्रेष्ठींनी त्यांना शहर अध्यक्ष पदीची पुन्हा एकदा संधी दिली आहे.
अतहरोद्यीन काझी दोन वेळा भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस पक्षश्रेष्ठींनी शहरअध्यक्ष पदाची दोन वेळा संधी दिली
होती. या कालावधीत त्यांनी शहरामध्ये पक्षसंघटन मजबुत केले. युवकांमध्ये कॉग्रेस पक्षाची धेयधोरणे व पक्षीय संघटन मजबुतकरीता प्रयतन केले, तसेच खासदार मुकूलजी वासनिक व जिल्हा कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार राहुलभाउ बोंद्रे यांच्या मार्गदर्षनाखाली त्यांच्या कार्याची दखल घेवून दिनांक 8 नोव्हेंबर रोजी शेगांव येथे जिल्हाध्यक्ष राहुलभाउ बोंद्रे यांच्या शहर अध्यक्षपदी निवडीचे पत्र अतहरो़द्यीन काझी यांना देण्यात आले आहे.
अतहरोद्यीन काझी यांची तिस-यांदा शहर अध्यक्षपदी निवड झाल्याबध्दल त्यांचे सर्वस्तरातुन अभिनंदन होत आहे.
चिखली शहर कॉग्रेसच्या अध्यक्षपदी अतहरोद्यीन काझी तिसऱ्यांदा
0
9
4
6
7
4
Users Today : 24
Leave a comment