रफीक खान चिखली:-
राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभाग चिखली तालुका अध्यक्ष पदी तेल्हारा येथील शेख रहेमान शेख लुखमान यांची नियुक्ती राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभाग जिल्हाध्यक्ष मोबिन अहमद यांनी 29 ऑक्टोम्बर रोजी केली आहे.चिखली तालुका रा.कॉ. अल्पसंख्याक विभाग तालुका अध्यक्ष रफ़ीक शेख यांची फादर बॉडी मध्ये जिल्हा सचिव म्हणून नियुक्ती झाल्याणे त्यांनी तालुकाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. सदर पद रिक्त झाले होते राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभाग सरचिटणीस पदी काम करत असलेले तेल्हारा येथील शेख रहेमान शेख लुखमान यांची अल्पसंख्याक विभाग बुलढाणा जिल्हाध्यक्ष मोबिन अहमद सर यांनी त्यांची चिखली तालुकाध्यक्ष पदी नियुक्ती केली या वेळी नवनियुक्त राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा सचिव रफ़ीक शेख ,प्रशांत झीने,शेख शाहरुख भाई ,आदि उपस्थित होते,शेख रहेमान यांची तालुकाध्यक्ष पदी नियुक्ती झाल्याने त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
Users Today : 25