आ. सौ. श्वेताताई महाले पाटील
चिखली
कोणत्याही विकास कामासाठी लागणारा निधी आणण्यासाठी काय काय करावे लागते हे जावे त्याच्या वंशी त्यालाच कळत असते. जनतेकडून आलेली मागणी, त्यासाठी निधी कुठून ऊपलब्ध करावा यासाठी घ्यावे लागणारे कष्ट, काम प्रस्तावीत करण्यापासुन ते ते मंजुर करण्यासाठी करावा लागणारा पाठपुरावा, कामांची अंदाज पत्रके, त्या अंदाज पत्रकांना तांत्रिक मान्यता, प्रशासकीय मान्यता घेणे, कामांची निविदा प्रसिद्ध करणे यासाठी लोकप्रतिनिधी पाठ पुरावा करतात. परंतु निविदा प्रसिद्ध झाल्यानंतर काम कुणी घ्यावे हे कुणाच्याच हातात नसते. रोजगाराची मोठी समस्या असल्याने कंत्राटदार काम घेतांना स्पर्धा करून काम मिळवतात. परंतू कमी कमी किमतीने काम घेतल्यानंतर त्या कामाचा दर्जा अंदाज पत्रकाप्रमाणे राहत नाही . परिणामी कामाचा दर्जा घासरतो आणि काम नित्कृष्ट होते. जे काम करण्यासाठी अथक परिश्रम घेतलेले असतात ते काम नित्कृष्ट झाल्यानंतर जनतेमध्ये तीव्र असंतोष पसरतो .परिणामी कंत्राटादाराला दोषी ठरविले जातेच पण लोकप्रतिनिधींचा कामाच्या नित्कृष्टे बद्दल काहीही सहभाग नसतांना जनता लोकप्रतिनधींना सुद्धा दोष देतात. यासाठी काम करणाऱ्या यंत्रणांनी ठेकेदाराकडून चांगले काम करुन घेणे गरजेचे असून यापुढे काम खराब झाल्यास दोषींना माफ केले जाणार नसल्याचा सज्जड दम आ सौ श्वेता ताई महाले पाटील यांनी चांधई येथे चिखली जाफराबाद रस्त्याच्या भूमिपूजन प्रसंगी दिला.
दि ५ नोव्हेंबर २०२२ रोजी चांधई आणि पळसखेड येथे ३ कोटी ४७ लक्ष रुपये किमतीच्या विविध कामाचा भूमिपूजन आ सौ श्वेता ताई महाले पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.यामध्ये चिखली – जाफ्राबाद रस्त्याची सुधारणा करणे, किमी 23/400 ते 25/ 400 , किंमत 1कोटी 50 लक्ष या कामाचा शुभारंभ करण्यात आला.
पळसखेड दौलत येथे दोन कोटी रुपयांच्या कामांचे भूमिपूजन संपन्न
या भूमिपूजन सोहळा वेळी पळसखेड दौलत या गावातील जवळपास दोन कोटी रुपयांच्या कामांचे भूमिपूजन संपन्न झाले. यामध्ये मौजे पळसखेड दौलत येथे जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजना भूमिपूजन, कामाची किंमत 1 कोटी 44 लक्ष रुपये, अंतर्गत सिमेंट रस्ता किंमत 25 लक्ष रुपये, स्मशानभूमी संरक्षण भिंत लोकार्पण, किंमत 12 लक्ष रुपये, महादेव मंदिर परिसर पेव्हर लोकार्पण किंमत 7 लक्ष रुपये, वाढीव पोल व नविन किंमत 8.50 लक्ष रुपये या विकासकामांचा समावेश आहे.
या भूमिपूजन सोहळ्यास मा. डॉ. प्रतापसिंग राजपूत जिल्हा उपाध्यक्ष भाजप, मा. ओमसिंग राजपूत शिवसेना जिल्हाप्रमुख, मा. सुधाकरजी काळे जिल्हा उपाध्यक्ष भाजपा, मा. पंडित दादा देशमुख शहराध्यक्ष भाजप, मा. प्रा. वीरेंद्र वानखेडे जिल्हा कार्यकारिणी सदस्य, मा. डॉ. कृष्णकुमार सपकाळ तालुका अध्यक्ष भाजपा, मा. बळीराम काळे, सरपंच मा. भरत जोगदंडे, सरपंच मा. सौ. नेहा गायकवाड, मा. सौ. कोकिळाबाई सोळंके, मा. किशोर सोळंके तालुका उपाध्यक्ष भाजपा, मा. वसंतराव गाडेकर गुरुजी, मा. निवृत्ती सोळंके तालुका सचिव भाजप, मा. सुनील रगड माजी सरपंच, मा. बाळू पाटील, मा. अनमोल ढोरे पाटील तालुका उपाध्यक्ष भाजपा, मा. मदन राजे गायकवाड, मा. सलीम भाई परवेज, मा. हरीभाऊ परिहार शहर उपाध्यक्ष, मा. अमोल परिहार तालुका उपाध्यक्ष भाजपा, सर्वश्री अशोक इंगळे, प्रताप पाटील, राजू जाधव, सूरज इंगळे, संदिप वानखेडे, भागवत गायकवाड, विट्ठल परिहार, रामेश्वर सोळंके, राजू इंगळे, विजय इंगळे, पिंटू पाटील, नीरज गायकवाड, ग्रामसेवक शिवशंकर खेडेकर, रामेश्वर सोळंके, परमेश्वर सोळंके, संजय जाधव यांच्यासह पदाधिकारी व गावकरी मंडळी उपस्थित होती.
Users Today : 25