रितेश कुमार टीलावत
तेल्हारा प्रतिनिधी
धामणगाव रेल्वे शहरातील
जे बी पार्क मधील बालाजी श्री खाटू श्याम मंदिराच्या भव्य सभागृहात विदर्भातील सुप्रसिद्ध भजन गायक श्री चंद्रकांत जी तिवारी यांच्या सुमधुर वाणीतून श्री खाटू बाबा भजन संध्या संपन्न झाली.
कोट्यावधी भक्त जणांचे श्रद्धास्थान श्री खाटू नरेश यांच्या जन्मोत्सवानिमित्त धामणगाव रेल्वे येथे श्री खाटू श्याम मंदिर मध्ये दोन दिवसीय जन्मोत्सव कार्यक्रम संपन्न झाला. त्यात खाटू श्यामजी च्या मूर्तीला भव्य आकर्षक पुष्प सजावट ,छप्पन भोग, दिव्य ज्योत दर्शन व श्याम किर्तन असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. खाटू नरेश यांच्या शृंगारचे दर्शन घेण्यासाठी यवतमाळ, अमरावती, अकोला, नागपूर येथून हजारो भाविक भक्त यांची उपस्थिती लाभली.
संध्याकाळी सात वाजता पासून विदर्भाचे सुप्रसिद्ध भजन गायक श्री चंद्रकांत जी तिवारी यांच्या सुमधुर वाणीतून भजन संध्या आयोजित करण्यात आली होती. हजारो भक्तगणांना गायक चंद्रकांत जी तिवारी त्यांच्या सुमधुर वाणीतून श्री खाटू श्याम भजनाने मंत्रमुग्ध केले.होऊन. सदरहू भजन संध्येत दर्जी सील दे निसान मने खाटू जानू से , पलको का घर तयार सावरे ,या भजनानी श्रोते मंत्रमुग्ध झाले. चंद्रकांत तिवारी यांच्या भजनांवर भक्तगणांनी थिरकण्याचा आनंद लुटला. भजन संध्या चा समारोप श्री खाटू श्याम बाबा च्या आरतीने करण्यात आला. तदनंतर उपस्थित सर्व भक्त गणांनी महाप्रसाद चा आस्वाद घेतला.
Users Today : 38