संभाजी ब्रिगेडचे महासचिव सौरभ खेडेकर ह्यांच्या नेतृत्वात संभाजी ब्रिगेड भारत जोडो यात्रेत सहभागी होणार…..

Khozmaster
2 Min Read
संभाजी ब्रिगेडचा भारत जोडो यात्रेस जाहीर पाठिंबा.
 प्रतिनिधी शुभम ढवळे :-
 संभाजी ब्रिगेड चे प्रदेशाध्यक्ष ॲड.मनोज आखरे यांनी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेस पक्षाचे नेते राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वात कन्याकुमारी येथून सुरू झालेल्या भारत जोडो यात्रेस जाहीर पाठिंबा दिला आहे. देशातील शेतीमाल धोरण,स्वामिनाथन आयोग, महागाई, बेरोजगारी, शासकीय कंपनी चे खाजगीकरण, देशातील धर्मधर्मातील अस्थिरता यासह अनेक‌ समस्यावर सध्या राहुलजी गांधी यांनी भारत जोडो यात्रा सुरू केली आहे.
 हि यात्रा येत्या १८,१९,२० नोव्हेंबर २०२२ रोजी मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यातील शेगांव, खामगाव, संग्रामपूर, जळगांव जामोद तालुक्यातून मध्यप्रदेश मध्ये जाणार आहे.संभाजी ब्रिगेड याच विषयावर नेहमी महाराष्ट्र राज्यातत्या निकाली काढण्यासाठी  मागण्या,आंदोलने करीतआहेत. आज भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या भारत जोडो यात्रेचा हाच उद्देश असल्यामुळे संभाजी ब्रिगेड ने भारत जोडी यात्रेस पाठिंबा दिला आहे.
भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने संभाजी ब्रिगेड चे महासचिव सौरव खेडेकर यांच्या नेतृत्वात तथा प्रदेश कार्याध्यक्ष बुलढाणा जिल्हा संपर्कप्रमुख डॉ.गजानन पारधी, विभागीय अध्यक्ष गजानन भोयर,  संभाजी ब्रिगेडचे बुलढाणा उत्तर विभागाचे जिल्हाध्यक्ष योगेश पाटील, बुलडाणा दक्षिण  विभागाचे जिल्हाध्यक्ष  विकास खंडागळे  यांच्या मार्गदर्शनाखाली मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यातील संभाजी ब्रिगेडचे जिजाऊ ब्रिगेड व इतर सर्व कक्षाचे जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्ते या भारत जोडो यात्रेत सहभागी होणार आहेत.
अशी माहिती संभाजी ब्रिगेडचे जिल्हा प्रवक्ता अमोल दाभाडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
0 9 4 6 7 5
Users Today : 25
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *