फिट इंडिया मुव्हमेंट अंतर्गत सामान्य ज्ञान चाचणीत सहभागाचे आवाहन

Khozmaster
1 Min Read

प्रतिनिधी प्रविण चव्हाण

 

          नंदुरबार -: केंद्रीय मंत्रालय व स्पोटर्स अथॉरिटी ऑफ इंडीया (साई) यांच्यावतीने शालेय विद्यार्थ्यासाठी क्रीडा विषयक सामान्य ज्ञान चाचणीचे (Quiz-2) आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-2020 मध्ये शिक्षणातील खेळाचे महत्व आणि शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात खेळ आणण्यावर भर देण्यात आला आहे. शिक्षण विभागातंर्गत साक्षरता विभाग युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या सहकार्याने फिट इंडीया मिशन अंतर्गत शाळांसाठी विविध शारीरिक आणि क्रीडा उपक्रम आयोजित करीत आहे. त्यातील एक म्हणजे फिट इंडिया क्वीज हा असून या उपक्रमात सहभागी होण्यासाठी शाळा व विद्यार्थ्यांनी फिट इंडीया क्वीज नोंदणी https://fitindia.gov.in/fit-india-quiz या संकेतस्थळावर 15 नोव्हेंबर, 2022 पर्यंत शाळा,महाविद्यालयातील खेळाडू आणि विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभागासाठी नोंदणी करावी. असे आवाहनही जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांनी केले आहे.

0 9 4 8 9 3
Users Today : 65
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *