भारत जोडो यात्रा संदर्भात पातुर शहरात पत्रकार आढावा बैठक

Khozmaster
1 Min Read

प्रतिनिधी रामेश्वर वाढी 

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा येणाऱ्या 16,,17 तारखेला अकोला जिल्ह्यातील पातुर तालुका व बाळापूर तालुका जात असल्याने पत्रकार बैठक घेऊन भारत जोडो यात्रे संदर्भात पत्रकारांना माहिती देण्यात आली यामध्ये अकोला जिल्ह्यातील पहिले ठिकाण पातुर शहर आहे यात्रा सुरुवात येणाऱ्या 16 तारखेला रात्री राहुल गांधीजींचे आगमन होत आहे व 17 तारखेला पहाटे 5 वाजता जिनिंग फॅक्टरी येथुन जुने बस स्थानक ,,संभाजी चौक ,, ते दसरा मैदान या ठिकाणाहून वाडेगाव बाळापुर कडे भारत जोडो यात्रा रवाना होत आहे या यात्रेमध्ये अकोला जिल्ह्यातून नागरिकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे त्याकरिता वाहनांचे नियोजन पार्किंगच्या सुविधा, आणि एक दिवस आधी बाहेरून येणाऱ्या नागरिकांची राहण्याची व्यवस्था, या संदर्भात चर्चा करण्यात आली बाहेरून येणाऱ्या नागरिकांना आपली वाहने पार्किंग मध्ये ठेवण्याचे आव्हान सुद्धा करण्यात आले व पातुर शहरा लगत असलेल्या खानापूर रोड अकोला रोड,या ठिकाणी वाहनांची पार्किंगची सुविधा करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली यावेळी काँग्रेस नेते प्रकाश तायडे, हाजी सय्यद बुराण ठेकेदार, माजी न.प उपाध्यक्ष गावंडे, अकोला येथील पठाण, सय्यद कामृद्दिन, सैय्यद मुख्तार, बंटी गहिलोत, चंद्रकांत बारताशे, विलास देवकर व इलेक्ट्रॉनिक्स मीडिया व प्रिंट मीडियाचे तालुका व शहर प्रतिनिधी यांची उपस्थिती होती

0 9 4 7 9 8
Users Today : 38
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *