अमिनपूर येथे भगवान बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना पूज्यभन्ते बी.संघपाल थेरो यांचे लाभले मार्गदर्शन प्रतिनिधी विशाल गवई अकोट तालुक्यातील अमिनपूर येथे भारतीय बौद्ध महासभा ग्रामशाखा समस्त बौध्द पंच मंडळ तथा उपासिका संघ,अमिनपूर मुंडगाव परिसर यांच्या विद्यमाने तथागत भगवान गौतम बुद्ध यांची मूर्ती प्रतिष्ठापना शुक्रवार ता.११ रोजी सकाळी ११ वाजता धम्मरॅली काढण्यात आली व भगवान बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली.यावेळी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.उद्घाटक म्हणून पूज्यभन्ते बी.संघपाल थेरो व्यवस्थापक चैत्यभूमी मुंबई हे होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद च्या अध्यक्षा संगिता अढाऊ ह्या होत्या.प्रमुख पाहूणे जि.प.उपाध्यक्ष सुनिल फाटकर,जि.प.सभापती आम्रपाली खंडारे,जि.प.सभापती रिजवाना परवीन शेख मुख्तार,जि.प.विषय समिती सभापती योगिता रोकडे,जि.प.विषय समिती सभापती माया नाईक,जि.प.सदस्या सुष्मिता सरकटे,माजी अध्यक्ष वंबआ प्रदिप वानखडे, जिल्हाध्यक्ष वंबआ प्रमोद देंडवे,मिलिंद इंगळे, समाज क्रांती आघाडीचे अकोला जिल्हाध्यक्ष दिगंबर पिंप्राळे हे होते.तर पं.स.सदस्य ज्ञानेश्वर दहिभात,मुंडगाव सरपंच श्रावण भरक्षे,लोहारी सरपंच प्रदिप सपकाळ, रमेश सरकटे,मुंडगाव उपसरपंच तुषार पाचकोर, चंद्रशेखर अंबळकार, विलासराव बहादूरे,विजय ढोरे, मनोहरराव गाढे गुरुजी,समिर पठाण, शंकरराव गवई, त्रिमूर्ती प्रतिष्ठान बहु.संस्थेचे पदाधिकारी आदींची प्रमुख उपस्थिती होती.पूज्यभन्ते बी.संघपाल थेरो यांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म याविषयी माहिती दिली व बौद्ध तत्वज्ञानावर आधारित उदाहरणे दिलीत.कार्यक्रमाला मोठ्या संख्येने बौद्ध उपासक व उपासिका यांची उपस्थिती होती.
अमिनपूर येथे भगवान बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना पूज्यभन्ते बी.संघपाल थेरो यांचे लाभले मार्गदर्शन
0
9
4
7
9
8
Users Today : 38
Leave a comment